मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS Weather Report: भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट, असं आहे चेन्नईचं हवामान

IND vs AUS Weather Report: भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट, असं आहे चेन्नईचं हवामान

Mar 22, 2023, 11:20 AM IST

  • ind vs aus 3rd odi Chennai weather report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना चेन्नई येथे होणार आहे. गेल्या आठवडाभरापासून येथे पावसाचे वातावरण आहे.

IND vs AUS 3rd odi Weather Report

ind vs aus 3rd odi Chennai weather report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना चेन्नई येथे होणार आहे. गेल्या आठवडाभरापासून येथे पावसाचे वातावरण आहे.

  • ind vs aus 3rd odi Chennai weather report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना चेन्नई येथे होणार आहे. गेल्या आठवडाभरापासून येथे पावसाचे वातावरण आहे.

ind vs aus 3rd odi Chennai weather report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना आज (२२ मार्च) होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुपारी १:३० वाजल्यापासून सुरू होईल. चेन्नईत गेल्या आठवड्यापासून (Chennai Weather Updates) पावसाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील आकाशही ढगांनी व्यापले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

पहिल्या डावादरम्यान पावसाची शक्यता

हवामान तज्ज्ञांच्या मते, चेन्नईमध्ये आजही (२२ मार्च) पाऊस पडू शकतो. पावसासोबत येथे जोरदार वारेही वाहू शकतात. त्यामुळे सामन्याच्या पहिल्या डावात अडथळा येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या डावात पावसाची शक्यता कमी आहे. एकूणच सामन्यादरम्यान चेन्नईमध्ये पावसाची ४०% शक्यता आहे. म्हणजेच सामन्यात पाऊस पडला तरी सामन्यातील काही षटके कमी करून निकाल लागण्याची शक्यता कायम राहणार आहे.

चेन्नईतील सामन्यादरम्यान पहिल्या डावातील तापमान ३२ अंशांच्या आसपास राहू शकते, तर दुसऱ्या डावात ते २७ अंशांपर्यंत राहू शकते. आर्द्रता ७७% पर्यंत राहू शकते आणि वारे सतत वाहू शकतात. या हवामानामुळे फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनाही चांगली सीम आणि स्विंग मिळू शकते.

सामना अतिशय रंजक होणार

जर चेन्नईमध्ये पावसाचा अडथळा आला नाही, तर हा निर्णायक सामना खूपच मनोरंजक ठरू शकतो. कारण हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे दिसत आहे. दोन्ही संघांमध्ये विशेषज्ञ फलंदाज आणि गोलंदाजांसह अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये अनेक सामना जिंकणारे खेळाडू आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत सामन्याची स्थिती आणि दिशा बदलू शकतात.

चेपॉकवर ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा सरस

याशिवाय ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे शेवटच्या वनडेत टीम इंडियाचा पराभव केला त्यामुळे हा अंतिम सामनाही रंजक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चेपॉकवर पाहुण्या संघाचा रेकॉर्ड भारतापेक्षा सरस आहे. ऑस्ट्रेलियाने चेपॉकमध्ये ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने येथे १३ पैकी केवळ ७ सामने जिंकले आहेत.