मराठी बातम्या  /  क्रीडा  /  अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा होणार पिता, पत्नी राधिकाने शेअर केले फोटो

अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा होणार पिता, पत्नी राधिकाने शेअर केले फोटो

Jul 23, 2022, 02:04 PM IST

    • Ajinkya Rahene: अजिंक्य राहणेची पत्नी राधिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ऑक्टोबर २०२२.
अजिंक्य रहाणे पुन्हा होणार बाबा (Instagram)

Ajinkya Rahene: अजिंक्य राहणेची पत्नी राधिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ऑक्टोबर २०२२.

    • Ajinkya Rahene: अजिंक्य राहणेची पत्नी राधिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ऑक्टोबर २०२२.

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुसऱ्यांदा पिता होणार आहे. रहाणेची पत्नी राधिका (Radhika Dhopavkar) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पती अजिंक्य रहाणे आणि मुलीसोबत दिसत आहे.  रहाणे खराब फॉर्ममुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत (IND vs ENG) संघात स्थान मिळवू शकला नाही आणि सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

नेटीझन्सने केलं अभिनंदन

रहाणे आणि राधिकाने २०१४ मध्ये लग्न केले आणि राधिकाने २०१९ मध्ये एका मुलीला जन्म दिला. रहाणे आता पुन्हा एकदा बाबा होणार आहे. राधिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ऑक्टोबर २०२२. यासोबतच तिने बेबी बंप आणि हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. राधिकाच्या या पोस्टवर अनेकांनी तिचे अभिनंदनही केले आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये राधिका दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे त्याच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.

रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली. मात्र, त्यानंतर त्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे. रहाणेने भारतासाठी आतापर्यंत ८२ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

विभाग