मराठी बातम्या  /  क्रीडा  /  क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारचा अपघात, १७ कोटींच्या buggati veyron चा चुराडा

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारचा अपघात, १७ कोटींच्या buggati veyron चा चुराडा

Jun 21, 2022, 04:08 PM IST

    • कारचा अपघात झाला तेव्हा रोनाल्डो (Cristiano Ronaldo) कारमध्ये उपस्थित नव्हता. रोनाल्डो सध्या कुटुंबासोबत स्पेनमध्ये सुट्टी घालवत आहे.
ronaldo

कारचा अपघात झाला तेव्हा रोनाल्डो (Cristiano Ronaldo) कारमध्ये उपस्थित नव्हता. रोनाल्डो सध्या कुटुंबासोबत स्पेनमध्ये सुट्टी घालवत आहे.

    • कारचा अपघात झाला तेव्हा रोनाल्डो (Cristiano Ronaldo) कारमध्ये उपस्थित नव्हता. रोनाल्डो सध्या कुटुंबासोबत स्पेनमध्ये सुट्टी घालवत आहे.

स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. रोनाल्डोकडे अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहेत. रोनाल्डोच्या अशाच एका अलीशान बुगाटी वेरॉन (buggati veyron) या कारचा अपघात झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

सोमवारी सकाळी स्पॅनिश शहर मॅलोर्का येथील एका घराच्या एंट्री गेटसमोर कारचा भीषण आपघात झाला. कारचा अपघात झाला तेव्हा रोनाल्डो कारमध्ये उपस्थित नव्हता.

आपघातग्रस्त कार रोनाल्डोचा कर्मचारी चालवता होता. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे बुगाटी वेरॉनच्या पुढील भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात चालकाचे कसलेही नुकसान झाले नाही.

कारचा अपघात झाला तेव्हा रोनाल्डो कारमध्ये उपस्थित नव्हता. या Bugatti Veyron ची किंमत जवळपास १६.२५ कोटी रुपये आहे.

दरम्यान, क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या आपल्या कुटुंबासह स्पेनमध्ये सुट्टी घालवत आहे.

पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. रोनाल्डोने यावर्षी जोसेफ बीकनला (८०५ गोल) मागे टाकले होते. बिकनने फिफाच्या रेकॉर्डनुसार एकूण ८०५ गोल केले होते. रोनाल्डो हा आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.