मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cristiano Ronaldo: कतारनं सौदीकडून शिकलं पाहिजे, रोनाल्डो अन् गर्लफ्रेंडचा सर्वात मोठा गुन्हा माफ

Cristiano Ronaldo: कतारनं सौदीकडून शिकलं पाहिजे, रोनाल्डो अन् गर्लफ्रेंडचा सर्वात मोठा गुन्हा माफ

Jan 07, 2023, 03:35 PM IST

    • Cristiano Ronaldo Georgina Relationship Saudi Arabia: सौदी अरेबिया हा कट्टर इस्लामिक देश आहे. या देशांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहण्यास पूर्णपणे बंदी आहे. इतकेच नाही तर लग्नाशिवाय एकाच छताखाली राहणे, रूम शेअर करणे हाही गुन्हा आहे. पण सौदीने आपल्या पाहुण्यांसाठी या नियमाशी तडजोड केली आहे. हे जोडपे पती-पत्नीसारखे एकत्र राहणार आहेत.
Cristiano Ronaldo & Georgina in Saudi Arabia

Cristiano Ronaldo Georgina Relationship Saudi Arabia: सौदी अरेबिया हा कट्टर इस्लामिक देश आहे. या देशांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहण्यास पूर्णपणे बंदी आहे. इतकेच नाही तर लग्नाशिवाय एकाच छताखाली राहणे, रूम शेअर करणे हाही गुन्हा आहे. पण सौदीने आपल्या पाहुण्यांसाठी या नियमाशी तडजोड केली आहे. हे जोडपे पती-पत्नीसारखे एकत्र राहणार आहेत.

    • Cristiano Ronaldo Georgina Relationship Saudi Arabia: सौदी अरेबिया हा कट्टर इस्लामिक देश आहे. या देशांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहण्यास पूर्णपणे बंदी आहे. इतकेच नाही तर लग्नाशिवाय एकाच छताखाली राहणे, रूम शेअर करणे हाही गुन्हा आहे. पण सौदीने आपल्या पाहुण्यांसाठी या नियमाशी तडजोड केली आहे. हे जोडपे पती-पत्नीसारखे एकत्र राहणार आहेत.

Ronaldo Georgina Saudi Arabia: पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिनासोबत सौदी अरेबियात आहे. त्याने सौदी अरेबियाच्या अल नासर या फुटबॉल क्लबशी करार केला आहे. रोनाल्डो या क्लबकडून खेळताना दिसणार आहे. परंतु रोनाल्डो आणि त्याच्या गर्लफ्रेंडमुळे नाव वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

रोनाल्डोने अद्याप त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिनासोबत लग्न केले नाही, सध्या दोघेही लिव्ह-इनमध्ये राहतात. विशेष म्हणजे दोघे सौदीमध्येही ते लिव्ह-इनमध्येच राहणार आहेत. मात्र,  सौदी अरेबिया हा कट्टर इस्लामिक देश आहे. या देशांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहण्यास पूर्णपणे बंदी आहे. इतकेच नाही तर लग्नाशिवाय एकाच छताखाली राहणे, रूम शेअर करणे हाही गुन्हा आहे. पण सौदीने आपल्या पाहुण्यांसाठी या नियमाशी तडजोड केली आहे. हे जोडपे पती-पत्नीसारखे एकत्र राहणार आहेत.

रोनाल्डोवर कारवाई होणार नाही

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोनाल्डोवर कारवाई होणार नाही. सौदी अधिकारी रोनाल्डोवर कारवाई करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. रोनाल्डो जॉर्जिनाला २०१६ पासून ओळखतो. दोघांना दोन मुले आहेत. याशिवाय रोनाल्डोला आणखी ३ मुले आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जर रोनाल्डो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत येथे राहिला तर त्याच्यावर कारवाई अपेक्षित नाही.

सौदीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “लग्नाशिवाय एकत्र राहणे सौदी अरेबियाच्या नियमांच्या विरोधात आहे. पण आता अशा केसेसमधील कट्टरपणा थोडा कमी झाला आहे. मात्र, एखादा मोठा गुन्हा घडत असेल तर या कायद्याचा वापर नक्कीच कठोरपणे होतो”.

विशेष म्हणजे सौदी अरेबियाचे नागरिक आणि प्रशासन आता परदेशी लोकांच्या बाबतीत फारसा हस्तक्षेप करत नाहीत. अशा परिस्थितीत रोनाल्डोच्या बाबतीतही कारवाई होण्याची फारशी अपेक्षा नाही. रोनाल्डोने सौदी क्लबसोबत जो करार केला आहे तो २०२५ पर्यंत चालणार आहे.

कतारनं सौदीकडून शिकलं पाहिजे

दरम्यान, नुकताच कतारमध्ये फिफा वर्ल्डकप २०२२ पार पडला. या स्पर्धेदरम्यान कतारने अनेक निर्बंध लादले होते. या निर्बंधांमुळे युरोपियन चाहते चांगलेच त्रस्त झाले होते. करातरमध्ये कपड्यांपासून ते दारू पर्यंत अशा अनेक बाबतीत अतिशय कडक नियम लादण्यात आले होते. त्यामुळे कतारने सौदी अरेबियाकडून थोडासा उदारपणा शिकला पाहिजे अशी मागणी चाहत्यांकडून होत आहे.