मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Amitabh Bachchan : लहान मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर करणं अंगलट, अमिताभ यांच्यावर जोरदार टीका

Amitabh Bachchan : लहान मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर करणं अंगलट, अमिताभ यांच्यावर जोरदार टीका

May 18, 2023, 03:41 PM IST

    • Amitabh Bachchan post Instagram video : अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एका लहान मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्याचवेळी या व्हिडीओवरुन वाद सुरु आहे.
Amitabh Bachchan

Amitabh Bachchan post Instagram video : अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एका लहान मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्याचवेळी या व्हिडीओवरुन वाद सुरु आहे.

    • Amitabh Bachchan post Instagram video : अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एका लहान मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्याचवेळी या व्हिडीओवरुन वाद सुरु आहे.

Amitabh Bachchan post Instagram video : बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मूल घरामध्ये बॅटिंग करताना दिसत आहे. यादरम्यान ते लहान मुल अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या शॉट्स खेळताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

अमिताभ यांची इन्स्टाग्राम पोस्ट

व्हिडीओमधले मूल अगदी लहान दिसत असले तरी ते अप्रतिम शॉट्स खेळत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत अमिताभ यांनी लिहिले की, भारताचे भविष्य सुरक्षित हातात आहे".

धोनी-कोहलीच्या शॉट्स

फलंदाजी करताना हा मुलगा महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसत आहे. याशिवाय मुलाने क्रिकेट जगतातील महान खेळाडू विराट कोहलीसारखाच कव्हर ड्राईव्हही खेळला आहे. तसेच मुलाने सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह मारला. ज्या शॉट्स मोठ्या क्रिकेटपटूंनाही खेळता येत नाहीत, त्या या मुलाने एका मिनिटाच्या व्हिडीओत खेळून दाखवल्या.

अमिताभ यांच्यावर टीका

मात्र, हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अमिताभ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार अमिताभ यांनी अर्धी आणि अपूर्ण माहिती शेअर केली आहे. लोकांनी कमेंटमध्ये हा मुलगा पाकिस्तानी असल्याचे सांगितले आहे. पण इतर अनेक युजर्सनी खेळात राष्ट्रीयत्वाच्या आधारावर कोणताही भेदभाव नसावा असे म्हणत नवोदित क्रिकेटपटूचे कौतुक केले आहे.

पाकिस्तानी संगीतकाराची कमेंट

अमिताभ यांच्या या पोस्टवर पाकिस्तानी संगीतकार गोहर मुमताज (Goher Mumtaz) यांनी कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले की, सर, हे मूल पाकिस्तानचे आहे. मी सोशल मीडियावर एका पाकिस्तानी पेजवर मुलाला त्याच्या आयडीसह पाहिले होते. त्यांनी पुढे लिहिले की, जर आपण एकमेकांच्या देशात खेळण्यास सहमत झालो तर क्रिकेटचे भविष्य आपल्या हातात आहे. आणि मी तुमचा मोठा चाहता आहे".