मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Aaron Finch-Bumrah: खतरनाक यॉर्करवर बोल्ड झाला, तरी फिंचनं बुमराहसाठी टाळ्या वाजवल्या, व्हिडीओ पाहा

Aaron Finch-Bumrah: खतरनाक यॉर्करवर बोल्ड झाला, तरी फिंचनं बुमराहसाठी टाळ्या वाजवल्या, व्हिडीओ पाहा

Sep 23, 2022, 10:54 PM IST

    • aaron finch clapping for jasprit bumrah: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना ८-८ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
india vs australia

aaron finch clapping for jasprit bumrah: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना ८-८ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

    • aaron finch clapping for jasprit bumrah: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना ८-८ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

एखाद्या गोलंदाजाने फलंदाजाला बाद केले तर फलंदाजाची प्रतिक्रिया काय असेल? फलंदाज गोलंदाजाकडे रागाच्या नजरेतून बघेल, हो ना? पण ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचने बाद झाल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकणारी रिअॅक्शन दिली आहे. भारताविरुद्ध नागपुरात झालेल्या ८-८ षटकांच्या सामन्यात बुमराहने फिंचला क्लीन बोल्ड केले. यानंतर फिंच बुमराहचे कौतुक करताना दिसला.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

वास्तविक, पावसामुळे मैदान ओले होते. तसेच, सामन्याला बराच वेळ वाया गेला होता. त्यामुळे हा सामना ८-८ षटकांचा खेळवण्यात आला. या छोट्या सामन्यात जसप्रीत बुमराहने ५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आरोन फिंचला क्लीन बोल्ड केले. बुमराहने खतरनाक यॉर्कर टाकला. ज्यावर अॅरोन फिंच क्लीन बोल्ड झाला. यानंतर फिंच नक्कीच निराश झाला होता, पण त्याने जसप्रीत बुमराहसाठी टाळ्या वाजवल्या कारण बुमराहने टाकलेला तो चेंडू कोणासाठीही खेळणे सोपे नव्हते. फिंचने १५ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. फिंचने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने ८ षटकांत ९१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शेवटच्या तीन षटकात ४४ धावा कुटल्या. वेडने २० चेंडूत ४३ धावा ठोकल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

बुमराहचे शानदार पुनरामगन

जसप्रीत बुमराहला इंग्लंड दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून बुमराह टीम इंडियाच्या बाहेर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तो संघात नव्हता. यानंतर बुमराहच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात होते.

मात्र, जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यातून शानदार पुनरागमन केले. यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात २ षटकात २७ धावा देणाऱ्या उमेश यादवला संघाबाहेर बसावे लागले.