मराठी बातम्या  /  धर्म  /  Mahabharata : वीर योद्धा चंद्रहासासमोर जेव्हा अर्जुन झाला होता असहाय्य

Mahabharata : वीर योद्धा चंद्रहासासमोर जेव्हा अर्जुन झाला होता असहाय्य

May 24, 2023, 11:46 AM IST

  • Dharma News : महाभारतात अर्जुनाला सर्वेश्रेष्ठ योद्धा म्हणून पाहिलं गेलं आहे. अर्जुनाकडे असे बाण होते जे कधीच संपत नसत. मात्र हाच अर्जुन महाभारतातल्या युद्धातल्या काही परिस्थितीमध्ये असहाय्य झालेला पाहायला मिळाला आहे. असाच एक महाभारतातला किस्सा आज आपण इथे पाहाणार आहोत.

महाभारत (Entrepreneur India)

Dharma News : महाभारतात अर्जुनाला सर्वेश्रेष्ठ योद्धा म्हणून पाहिलं गेलं आहे. अर्जुनाकडे असे बाण होते जे कधीच संपत नसत. मात्र हाच अर्जुन महाभारतातल्या युद्धातल्या काही परिस्थितीमध्ये असहाय्य झालेला पाहायला मिळाला आहे. असाच एक महाभारतातला किस्सा आज आपण इथे पाहाणार आहोत.

  • Dharma News : महाभारतात अर्जुनाला सर्वेश्रेष्ठ योद्धा म्हणून पाहिलं गेलं आहे. अर्जुनाकडे असे बाण होते जे कधीच संपत नसत. मात्र हाच अर्जुन महाभारतातल्या युद्धातल्या काही परिस्थितीमध्ये असहाय्य झालेला पाहायला मिळाला आहे. असाच एक महाभारतातला किस्सा आज आपण इथे पाहाणार आहोत.

महाभारतात अर्जुनाला सर्वेश्रेष्ठ योद्धा म्हणून पाहिलं गेलं आहे. अर्जुनाकडे असे बाण होते जे कधीच संपत नसत. मात्र हाच अर्जुन महाभारतातल्या युद्धातल्या काही परिस्थितीमध्ये असहाय्य झालेला पाहायला मिळाला आहे. असाच एक महाभारतातला किस्सा आज आपण इथे पाहाणार आहोत. जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाचा जीव वाचवला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती, वाचा त्यांचा जीवन प्रवास

Lucky Plants for Home : कमी दिवसांमध्ये श्रीमंत व्हायचे असेल तर ही झाडं तुमच्या घरात नक्कीच लावा, जाणून घ्या

महाभारतात चंद्रहास नामक एका योद्ध्याचा उल्लेख पाहायला मिळतो. चंद्रहास श्रीविष्णूंचा परम भक्त होता. श्रीविष्णूंनीही त्याच्या तपस्येनं खूष होत त्यावर कोणत्याही अस्त्राचा परिणाम होणार नाही असा त्याला वर दिला होता.

महाभारतातल्या युद्धात चंद्रहास कौरवांच्या बाजूने लढत होता. चंद्रहासला सूर्यास्ताच्या आत परास्त करून त्याचा वध करू अशी शपथ अर्जुनाने घेतली होती. जर सूर्यास्तापूर्वी चंद्रहासाचा वध केला नाही तर मी अग्नीप्रवेश करून माझं जीवन संपवेन अशीही प्रतिज्ञा अर्जुनाने घेतली होती.

त्याच्या या प्रतिज्ञेनं अर्जुनाचं सारथ्य करणारे श्रीकृष्ण मात्र चिंतेत पडले होते. कारण त्यांनी चंद्राहासाला वर दिला होता. आता काय करायचं या चिंतेत श्रीकृष्ण होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी युद्ध सुरू झालं आणि अर्जुन आणि चंद्रहास एकमेकांसमोर आले. अर्जुन एकापेक्षा एक दिव्यास्त्र सोडत गेला मात्र त्याचा चंद्रहासवर काहीच प्रभाव होत नव्हता. हे पाहून अर्जुनाचा राग अनावर होत होता आणि तो आणखीन रागाने वेगवेगळी दिव्यास्त्र सोडत होता.

अर्जुनाने चंद्रहासवर ब्रह्मास्त्र सोडलं, चंद्रहासने त्याला अयशस्वी केलं. त्यानंतर अर्जुनाने चंद्रहासावर पशुपती शस्त्र वापरले, परंतु चंद्रहासाने तेही कापून टाकलं. असं करता करता सूर्यास्ताची वेळ जवळ आली आणि आता अर्जुन अग्नीप्रवेश करणार या आनंदात कौरव होते.

सरतेशेवटी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की आता बाण चालव आणि मी त्या बाणाच्या अग्रावर जाऊन बसतो. श्रीकृष्ण बाणाच्या अग्रस्थानी जाऊन बसले आणि अर्जुनाने बाण चालवला. त्या येणाऱ्या बाणाला पाहून चंद्राहासानेही बाण चालवला. अर्जुनाचा बाण चंद्रहासाने मधोमध तोडला मात्र श्रीकृष्णाच्या अग्रस्थानी असणाऱ्या भागाने चंद्रहासाचा गळा चिरला आणि चंद्रहासाने विष्णूचं नाव घेत जीव सोडला.

अशा प्रकारे खुद्द देवालाच आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी पुढे यावं लागलं. जर श्रीकृष्ण यात सहभागी झाले नसते तर अर्जुनाला अग्नीप्रवेश करत आपले प्राण त्यागावे लागले असते.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा