मराठी बातम्या  /  धर्म  /  Shattila Ekadashi : षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे पाच उपाय

Shattila Ekadashi : षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे पाच उपाय

Jan 17, 2023, 03:57 PM IST

  • Take Blessings Of Lord Vishnu On Shattila Ekadashi : तीळ हा उष्ण असल्याने या दिवसात तो शरीरासाठी आवश्यक असतो हे शास्त्र. मात्र देवांनाही या दिवसात तीळ प्रिय असतो. खासकरुन षटतिला एकादशीच्या दिवशी तीळ वापरात आणल्यास श्रीविष्णू प्रसन्न होतात असं सांगितलं जातं.

षटतिला एकादशी (हिंदुस्तान टाइम्स)

Take Blessings Of Lord Vishnu On Shattila Ekadashi : तीळ हा उष्ण असल्याने या दिवसात तो शरीरासाठी आवश्यक असतो हे शास्त्र. मात्र देवांनाही या दिवसात तीळ प्रिय असतो. खासकरुन षटतिला एकादशीच्या दिवशी तीळ वापरात आणल्यास श्रीविष्णू प्रसन्न होतात असं सांगितलं जातं.

  • Take Blessings Of Lord Vishnu On Shattila Ekadashi : तीळ हा उष्ण असल्याने या दिवसात तो शरीरासाठी आवश्यक असतो हे शास्त्र. मात्र देवांनाही या दिवसात तीळ प्रिय असतो. खासकरुन षटतिला एकादशीच्या दिवशी तीळ वापरात आणल्यास श्रीविष्णू प्रसन्न होतात असं सांगितलं जातं.

तिळाचं महत्व सांगणारी एकादशी म्हणजे षटतिला एकादशी. या दिवशी तिळाचे अगदी आंघोळीच्या पाण्यात तीळ घालण्यापासून ते देवाच्या पंचामृतात तीळ घालण्यापर्यंत सारे उपाय सांगण्यात आले आहेत. सध्या देशात थंडीचं वातावरण आहे. अशात तीळ हा उष्ण असल्याने या दिवसात तो शरीरासाठी आवश्यक असतो हे शास्त्र. मात्र देवांनाही या दिवसात तीळ प्रिय असतो. खासकरुन षटतिला एकादशीच्या दिवशी तीळ वापरात आणल्यास श्रीविष्णू प्रसन्न होतात असं सांगितलं जातं. जर तुम्हालाही श्रीविष्णूंची कृपा आपल्यावर हवी असं वाटत असेल तर त्यांना प्सन्न करण्यासाठी षटतिला एकादशीच्या दिवशी हे पाच उपाय करुन पाहा.

ट्रेंडिंग न्यूज

Chardham Yatra 2024 : चारधाममध्ये कोणत्या देवी-देवतांची पूजा केली जाते? जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला करा हे उपाय, सर्व अडचणी दूर होतील

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

आंघोळीच्या पाण्यात तीळ मिसळा

जर तुम्हाला तुमच्या अशुभापासून मुक्ती मिळवायची असेल तर षटतिला एकादशीच्या दिवशी तुमच्या पाण्यात गंगाजल आणि थोडे तीळ मिसळून स्नान करा. यानंतर ध्यान करून भगवान विष्णूची पूजा करा, तुम्हाला लाभ मिळतील.

तीळाचं उटणं

शरीरातील सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आरोग्य प्राप्तीसाठी षटतिला एकादशीला तीळ लावणे खूप फायदेशीर मानले जाते. या उकडीचा वापर केल्याने थंडी जाणवत नाही आणि शरीराला उष्णता मिळते.

तीळ हवनात अर्पण करा

भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचं हवन करा. या हवनात पाच मूठभर तीळ वापरावेत. यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा.

पंचामृतात तीळ मिसळा

शटतिला एकादशीच्या दिवशी पंचामृतात तीळ मिसळून भगवान विष्णूला स्नान घालावे. या उपायाने अशुभ दूर होते. याशिवाय पितरांकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना तीळ मिसळलेले पाणी अर्पण करा, सर्व इच्छा पूर्ण होतील.

अन्नामध्ये तीळ मिसळा

षटतिला एकादशीच्या दिवशी जेवण बनवताना तीळ जरूर घाला. सर्व प्रथम हे अन्न भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. त्यांना अन्न अर्पण करा, त्यानंतरच तुम्ही ते सेवन करा.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा