मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  केशव महाराजची लव्हस्टोरी! वाचा, गर्लफ्रेंडला पटवल्यानंतर घरच्यांना कसं पटवलं

केशव महाराजची लव्हस्टोरी! वाचा, गर्लफ्रेंडला पटवल्यानंतर घरच्यांना कसं पटवलं

Jun 20, 2022, 08:17 PMIST

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ वा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे दोन्ही देशातील ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात आफ्रिकेचे नेतृत्व हे केशव महाराज करत होता. कारण त्यांचा नियमित कर्णधार टेम्बा बवुमा चौथ्या सामन्यात जखमी झाला होता.

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ वा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे दोन्ही देशातील ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात आफ्रिकेचे नेतृत्व हे केशव महाराज करत होता. कारण त्यांचा नियमित कर्णधार टेम्बा बवुमा चौथ्या सामन्यात जखमी झाला होता.
केशव महाराज हा कायम चर्चेत असणारा खेळाडू आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या केशव महाराज याच्या पत्नीचे नाव लेरीशा मुनसामी आहे. ती एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. लेरीशा मुनसामीचे फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहेत. बॉलिवुड गाण्यांची शौकीन असलेल्या लारीशाचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
(1 / 7)
केशव महाराज हा कायम चर्चेत असणारा खेळाडू आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या केशव महाराज याच्या पत्नीचे नाव लेरीशा मुनसामी आहे. ती एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. लेरीशा मुनसामीचे फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहेत. बॉलिवुड गाण्यांची शौकीन असलेल्या लारीशाचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.(keshav maharaj, instagram)
केशव आणि लेरीशा यांची पहिली भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होत गेले. दोघांनीही त्यांचे नाते कुटुंब आणि जगापासून बरेच दिवस लपवून ठेवले होते. दोघांची पार्श्वभूमी वेगळी होती, त्यामुळे केशवसमोर त्यांच्या कुटुंबीयांना समजवण्याचे मोठे आव्हान होते.
(2 / 7)
केशव आणि लेरीशा यांची पहिली भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होत गेले. दोघांनीही त्यांचे नाते कुटुंब आणि जगापासून बरेच दिवस लपवून ठेवले होते. दोघांची पार्श्वभूमी वेगळी होती, त्यामुळे केशवसमोर त्यांच्या कुटुंबीयांना समजवण्याचे मोठे आव्हान होते.(keshav maharaj, instagram)
अशा परिस्थितीत केशवने आपल्या कुटुंबाची मंजूरी मिळवण्यासाठी एक उत्तम मार्ग शोधून काढला. केशवने त्याच्या आईच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त एक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये त्याने त्याची मैत्रीण लेरीशासोबत कथ्थक नृत्य केले. या नृत्यानंतर केशवची आई खूप प्रभावित झाली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने या नात्याला पुढे नेण्यास परवानगी दिली.
(3 / 7)
अशा परिस्थितीत केशवने आपल्या कुटुंबाची मंजूरी मिळवण्यासाठी एक उत्तम मार्ग शोधून काढला. केशवने त्याच्या आईच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त एक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये त्याने त्याची मैत्रीण लेरीशासोबत कथ्थक नृत्य केले. या नृत्यानंतर केशवची आई खूप प्रभावित झाली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने या नात्याला पुढे नेण्यास परवानगी दिली.(lerisha m, instagram)
केशव आणि लेरीशा यांचा २०१९ मध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, कोविड-१९ मुळे त्यांना लग्नासाठी जवळपास तीन वर्षे वाट पाहावी लागली. या वर्षी एप्रिल महिन्यात दोघांचे लग्न झाले. लेरीशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिला प्राण्यांविषयी विशेष प्रेम असल्याचे दिसून येते.
(4 / 7)
केशव आणि लेरीशा यांचा २०१९ मध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, कोविड-१९ मुळे त्यांना लग्नासाठी जवळपास तीन वर्षे वाट पाहावी लागली. या वर्षी एप्रिल महिन्यात दोघांचे लग्न झाले. लेरीशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिला प्राण्यांविषयी विशेष प्रेम असल्याचे दिसून येते.(keshav maharaj, instagram)
केशव महाराज याने दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत ४२ कसोटी, २१ एकदिवसीय आणि १३ टी-20 सामने खेळले आहेत. 
(5 / 7)
केशव महाराज याने दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत ४२ कसोटी, २१ एकदिवसीय आणि १३ टी-20 सामने खेळले आहेत. (keshav maharaj, instagram)
यादरम्यान केशवने कसोटी सामन्यात ३०.६७ च्या सरासरीने १५० विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, या फिरकीपटूच्या नावावर एकदिवसीय सामन्यात २५ आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात १० विकेट आहेत. केशवने कसोटी क्रिकेटमध्ये ९५३ धावा केल्या आहेत.
(6 / 7)
यादरम्यान केशवने कसोटी सामन्यात ३०.६७ च्या सरासरीने १५० विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, या फिरकीपटूच्या नावावर एकदिवसीय सामन्यात २५ आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात १० विकेट आहेत. केशवने कसोटी क्रिकेटमध्ये ९५३ धावा केल्या आहेत.(keshav maharaj, instaram)
केशव महाराजचे पूर्वज भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूरचे होते. केशवचे वडील आत्मानंद महाराज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे पूर्वज १८७४ च्या सुमारास सुलतानपूरहून आफ्रिकेतील डर्बनला गेले होते. त्या काळात भारतीय लोक सुखी जीवन जगण्यासाठी कामाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात जात असत.
(7 / 7)
केशव महाराजचे पूर्वज भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूरचे होते. केशवचे वडील आत्मानंद महाराज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे पूर्वज १८७४ च्या सुमारास सुलतानपूरहून आफ्रिकेतील डर्बनला गेले होते. त्या काळात भारतीय लोक सुखी जीवन जगण्यासाठी कामाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात जात असत.(keshav maharah, instagram)

    शेअर करा