मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Cricketers Birthday: हॅट्ट्रिक, त्रिशतक, वर्ल्डकप विनर... टीम इंडियाच्या 'या' ५ रत्नांचा आज वाढदिवस

Cricketers Birthday: हॅट्ट्रिक, त्रिशतक, वर्ल्डकप विनर... टीम इंडियाच्या 'या' ५ रत्नांचा आज वाढदिवस

Dec 06, 2022, 12:57 PMIST

६ डिसेंबर (आज) हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या ५ खेळाडूंचा आज वाढदिवस आहे. यापैकी ३ खेळाडू टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहेत. तर एकजण बऱ्याच दिवसापासून संघापासून दूर आहे. यासोबतच एका मोठ्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. आज वाढदिवस असलेल्या या ५ खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, करुण नायर आणि आरपी सिंग यांचा समावेश आहे.

  • ६ डिसेंबर (आज) हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या ५ खेळाडूंचा आज वाढदिवस आहे. यापैकी ३ खेळाडू टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहेत. तर एकजण बऱ्याच दिवसापासून संघापासून दूर आहे. यासोबतच एका मोठ्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. आज वाढदिवस असलेल्या या ५ खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, करुण नायर आणि आरपी सिंग यांचा समावेश आहे.
ravindra jadeja- टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आज ३४ वर्षांचा झाला. जडेजाने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. करिअर- वनडे सामने- १७१, धावा- २४४७, अर्धशत-१३, विकेट्स- १८९ कसोटी सामने- ६०, धावा- २५२३, शतक-३, अर्धशतक- १७, विकेट्स- २४२ टी-२० सामने- ६४, विकेट्स ५१, धावा-४५७
(1 / 6)

Jasprit Bumrah- वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज २८ वर्षांचा झाला आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत भारतासाठी ७२ एकदिवसीय, ६० टी-20 आणि ३० कसोटी सामने खेळले आहेत. वनडे विकेट- १२१, कसोटी विकेट-१२८, टी-२० विकेट्स- ७० सप्टेंबर २०१९ मध्ये बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत हॅट्ट्रिक घेतली होती. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो केवळ तिसरा भारतीय गोलंदाज आहे.
(2 / 6)

Shreyas Iyer- मुंबईचा हा फलंदाज आज २८ वर्षांचा झाला. श्रेयस अय्यरने भारतासाठी आतापर्यंत ४९ टी-२०, ३७ एकदिवसीय आणि ५ कसोटी सामने खेळले आहेत. श्रेयसने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शानदार शतक झळकावले होते. टी-२० धावा- १०४३, अर्धशतक-७, वनडे धावा- १४५२, अर्शधशतक- १३, शतक- २ कसोटी धावा- ४२२, शतक-१, अर्धशतक-३
(3 / 6)

Karun Nair- जोधपूरमध्ये जन्मलेला करुण नायर मूळचा कर्नाटकचा आहे. वीरेंद्र सेहवागनंतर ३१ वर्षीय करुण नायर हा कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने कारकिर्दीतील तिसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावले होते. मात्र त्यानंतर तो केवळ ३ कसोटी सामने खेळू शकला आहे. करुण नायर आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. कसोटी सामने ६- धावा ३७४, शतक १ वनडे-२, धावा-४६
(4 / 6)

Rudra Pratap Singh- रायबरेली येथे जन्मलेला आरपी सिंह आज ३७ वर्षांचा झाला आहे. उत्तर प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला धमाकेदार सुरुवात केली. २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध फैसलाबाद कसोटीत आरपीला पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात तो 'मॅन ऑफ द मॅच' ठरला. 2007 मध्ये पहिल्या T20 वर्ल्डमध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यात आरपीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. वनडे सामने- ५८, विकेट्स- ६९ कसोटी सामने- १४, विकेट्स ४० टी-२० सामने-१०- १५ विकेट्स निवृत्तीनंतर आरपी सिंग कॉमेंट्री विश्वात खूप नाव कमावत आहे.
(5 / 6)

Team India Cricketers Birthday
(6 / 6)
Team India Cricketers Birthday(all photo- instagram)

    शेअर करा