मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  T20 World Cup 2022: जगातील ‘हे’ सर्वोत्तम खेळाडू T20 विश्वचषकात दिसणार नाहीत

T20 World Cup 2022: जगातील ‘हे’ सर्वोत्तम खेळाडू T20 विश्वचषकात दिसणार नाहीत

Sep 30, 2022, 04:37 PMIST

T20 World Cup 2022: T20 विश्वचषकाला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यावेळी ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळवली जाईल. मात्र जगातील ४ सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या संघांना याचा खूप मोठा फटका बसू शकतो. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजा हे दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. तर जोफ्रा आर्चर आणि जॉनी बेअरस्टो इंग्लंडच्या संघात नसणार आहेत.

  • T20 World Cup 2022: T20 विश्वचषकाला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यावेळी ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळवली जाईल. मात्र जगातील ४ सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या संघांना याचा खूप मोठा फटका बसू शकतो. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजा हे दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. तर जोफ्रा आर्चर आणि जॉनी बेअरस्टो इंग्लंडच्या संघात नसणार आहेत.
भारताचे दोन दिग्गज खेळाडू या T20 विश्वचषकाचा भाग असणार नाहीत. वेगवान गोलंदाज बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तो नुकताच तंदुरुस्त झाल्यानंतर मैदानावर परतला होता. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-२० सामने खेळले. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला आहे. बुमराहमुळे भारताची डेथ बॉलिंग मजबूत वाटत होती. बुमराहचे संघात नसणे हे भारतासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
(1 / 5)

इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरला कोपराला दुखापत झाली होती. २०२१ मध्ये अहमदाबादमध्ये भारताविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने ससेक्ससाठी काही सामने खेळले परंतु दुखापती गंभीर होत चालल्याने त्याला पुन्हा मैदान सोडावे लागले. या दुखापतीमुळे तो २०२१ च्या टी२० विश्वचषक आणि २०२१ च्या ऍशेसमध्ये सहभागी होऊ शकला नाही. आर्चरने दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर त्याच्या पाठीला दुखापत झाली. १९ मे २०२२ रोजी त्याच्या पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते.
(2 / 5)

जॉनी बेअरस्टो गोल्फ खेळताना घसरून पडला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बेअरस्टो हा इंग्लंड संघामध्ये टेस्ट, T20 आणि एकदिवसीय अशा तिनही फॉर्मॅटमध्ये परफेक्ट फलंदाज मानला जातो. त्याला दुखापत होण्याच्या काही महिन्यांआधी झालेल्या सामन्यांमध्ये त्यानं चार शतकं झळकावली होती. वर्ल्डकप संघातून बेअरस्टोचं बाहेर होणं हे इंग्लीश संघासाठी मोठा धक्का आहे. 
(3 / 5)

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला. आशिया चषक स्पर्धेत तो फक्त पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्ध सामने खेळला होता, त्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला आणि त्याला आशिया चषक आणि त्यानंतर विश्वाचषकातून बाहेर व्हावे लागले. जडेजा हा टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो बॅट आणि बॉल तसेच क्षेत्ररक्षणाने सामना बदलू शकतो. अशा स्थितीत त्याचे विश्वाचषकात न खेळणे टीम इंडियासाठी नुकसानदायक ठरू शकते.
(4 / 5)

T20 World Cup 2022
(5 / 5)
T20 World Cup 2022(instagram)

    शेअर करा