मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Indian Economy: जागतिक मंदी असूनही भारतीय अर्थव्यवस्था 6.9% वाढेल: जागतिक बँक

Indian Economy: जागतिक मंदी असूनही भारतीय अर्थव्यवस्था 6.9% वाढेल: जागतिक बँक

Dec 06, 2022, 06:27 PMIST

इतर देशांच्या तुलनेत भारताला आंतरराष्ट्रीय मंदीचा फार कमी फटका बसला आहे, असे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • इतर देशांच्या तुलनेत भारताला आंतरराष्ट्रीय मंदीचा फार कमी फटका बसला आहे, असे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज सुधारला आहे. नव्या अंदाजामुळे वाढीची शक्यता वाढली आहे.अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ते 6.9% निर्धारित करण्यात आला आहे.  यापूर्वी तो 6.5% ने वाढेल असा अंदाज जागतिक बॅकेने व्यक्त केला होता. फाइल फोटो: रॉयटर्स
(1 / 6)
जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज सुधारला आहे. नव्या अंदाजामुळे वाढीची शक्यता वाढली आहे.अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ते 6.9% निर्धारित करण्यात आला आहे.  यापूर्वी तो 6.5% ने वाढेल असा अंदाज जागतिक बॅकेने व्यक्त केला होता. फाइल फोटो: रॉयटर्स(Reuters)
मंगळवारी जागतिक बॅकेने जारी केलेल्या अहवालानुसार, देशाच्या विकासावर कडक आर्थिक धोरण आणि उच्च वस्तूंच्या किमतींचा परिणाम होत आहे. अहवालात या वर्षी सरासरी किरकोळ महागाई ७.१% नोंदवण्यात आली आहे. फाइल फोटो: रॉयटर्स
(2 / 6)
मंगळवारी जागतिक बॅकेने जारी केलेल्या अहवालानुसार, देशाच्या विकासावर कडक आर्थिक धोरण आणि उच्च वस्तूंच्या किमतींचा परिणाम होत आहे. अहवालात या वर्षी सरासरी किरकोळ महागाई ७.१% नोंदवण्यात आली आहे. फाइल फोटो: रॉयटर्स(REUTERS)
भारत ही आशिया खंडातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे.  जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ६.३% वाढली. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार संपूर्ण आर्थिक वर्षासाठी एकूण जीडीपी वाढ ६.८-७% असू शकते. फाइल फोटो: शटरस्टॉक
(3 / 6)
भारत ही आशिया खंडातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे.  जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ६.३% वाढली. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार संपूर्ण आर्थिक वर्षासाठी एकूण जीडीपी वाढ ६.८-७% असू शकते. फाइल फोटो: शटरस्टॉक(ShutterStock)
जागतिक बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज वाढवला आहे. मात्र, त्याचवेळी पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज खूपच कमी करण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षाचा प्रारंभिक अंदाज ७ % होता. त्यानंतर तो ६.६% पर्यंत कमी करण्यात आला आहे. फाइल फोटो: पीटीआय
(4 / 6)
जागतिक बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज वाढवला आहे. मात्र, त्याचवेळी पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज खूपच कमी करण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षाचा प्रारंभिक अंदाज ७ % होता. त्यानंतर तो ६.६% पर्यंत कमी करण्यात आला आहे. फाइल फोटो: पीटीआय(PTI)
जागतिक मंदीचा भारतावर इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी परिणाम झाल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फाइल इमेज: ANI
(5 / 6)
जागतिक मंदीचा भारतावर इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी परिणाम झाल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फाइल इमेज: ANI(ANI)
जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा म्हणाले, "या टप्प्यावर, आम्हाला कर्जाचा सामना करण्याच्या भारताच्या क्षमतेबद्दल कोणतीही चिंता नाही." भारतावरील सार्वजनिक कर्जाचा बोजा कमी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
(6 / 6)
जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा म्हणाले, "या टप्प्यावर, आम्हाला कर्जाचा सामना करण्याच्या भारताच्या क्षमतेबद्दल कोणतीही चिंता नाही." भारतावरील सार्वजनिक कर्जाचा बोजा कमी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.(Reuters)

    शेअर करा