मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Gudhi Padwa 2023 : गुढीपाडव्याच्या आधी घरी आणा या गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Gudhi Padwa 2023 : गुढीपाडव्याच्या आधी घरी आणा या गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Mar 20, 2023, 07:52 AMIST

Hindu new year 2023: वास्तुशास्त्रानुसार घरात छोट्या छोट्या गोष्टींची भर घातल्यास वास्तु आपल्याला भरभराट देते. मग जर तुम्हालाही नव्या वर्षात भरभराट हवी असेल तर या काही गोष्टी आहेत ज्या घरात आणल्यास आर्थिक सुबत्ता येऊ शकते असं वास्तुशास्त्र सांगतं.

बुधवार २२ मार्च २०२३ पासून हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला भगवान ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदूंनी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी काही शुभ गोष्टी घरात आणल्या तर ते खूप शुभ असते. या शुभ गोष्टी घरात ठेवल्यास वर्षभर शुभ परिणाम मिळतील. 
(1 / 8)

लहान नारळ - एक छोटा नारळ कापडात गुंडाळा आणि गुढी पाडव्याच्या दिवशी तिजोरीत ठेवा. हा उपाय केल्याने तुमच्या घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येईल.संपूर्ण वर्ष तुम्हाला पैशाची कमतरता राहाणार नाही.
(2 / 8)

धातूचा हत्ती -धातुचा हत्ती घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो आणि वाईट शक्ती नष्ट करतो.गुढीपाडव्याच्या दिवशी ही मूर्ती घरात आणल्यास शुभवार्ता कानी पडू शकतील.
(3 / 8)

धातूचे कासव - हिंदू नववर्षाच्या दिवशी तुम्ही चांदी, पितळ, कांस्य किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेले कासव घरी आणू शकता. वास्तुशास्त्रात कासव हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
(4 / 8)

तुळशीचे रोप- हिंदू नववर्षात तुम्ही घरी तुळशीचे रोप लावू शकता. तुळशीची लागवड केल्यास वर्षभर घरात सुख-समृद्धी नांदते.तुळशीत माता लक्ष्मीचा वास असतो असं सांगितलं जातं.
(5 / 8)

लाफिंग बुद्धा -घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लाफिंग बुद्धा नेहमी ठेवावा. असं केल्याने घरात ठेवल्यास पैशाची कमतरता राहात नाही.
(6 / 8)

मोती आणि शंख - घरात सुबत्ता आणणारा आणि घरातल्या सदस्यांना आनंदी ठेवणारा म्हणून मोती आणि शंखाकडे पाहीलं जातं. हा मोती आणि शंख घरात पूजा करून तिजोरीत ठेवावा. 
(7 / 8)

मोरपंख - भगवान श्रीकृष्णाला सर्वाधिक प्रिय वस्तू म्हणजे मोरपीस, घरात लक्ष्मीमातेची कृपा हवी असेल तर घरात मोरपीस ठेवावं. मोरपीस हे भगवान श्रीकृष्णासोबतच माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे. 
(8 / 8)

    शेअर करा