मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : ‘मोदींना देवाच्या शेजारी बसवले तर ते देवालाही ब्रह्मांडाची माहिती सांगायला कमी करणार नाहीत'

Rahul Gandhi : ‘मोदींना देवाच्या शेजारी बसवले तर ते देवालाही ब्रह्मांडाची माहिती सांगायला कमी करणार नाहीत'

May 31, 2023, 04:24 PM IST

  • Rahul Gandhi on PM Narendra Modi : अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

Rahul Gandhi - Narendra Modi

Rahul Gandhi on PM Narendra Modi : अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

  • Rahul Gandhi on PM Narendra Modi : अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

Rahul Gandhi on PM Narendra Modi : अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थी व शिक्षण तज्ज्ञांशी संवाद साधताना भारतातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी आसूड ओढले.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची आणि दाव्यांची राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली. 'उद्या मोदींना देवाशेजारी बसवले तर ते त्यालाही लेक्चर द्यायला कमी करणार नाहीत. विश्वाची उत्पत्ती कशी झाली आणि हे विश्व कसे चालते, हे ते देवाला सांगू लागतील. मोदींच्या अशा बोलण्यामुळं देव स्वत:ही गोंधळून जाईल आणि आपण नक्की काय बनवलं असं त्याला वाटू लागेल, असा बोचरा टोला राहुल यांनी हाणला.

'सध्या भारत एका गटाकडून चालवला जात आहे. आपण सर्वज्ञानी आहोत, आपल्याला सर्व काही कळतं, अशी या गटाची खात्री आहे. शास्त्रज्ञांना विज्ञान, इतिहासकारांना इतिहास आणि लष्कराला युद्धनीती आपणच शिकवू शकतो, असं या गटाला वाटतं. प्रत्यक्षात या गटाला काहीच कळत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा आणि भाषिक राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. केंद्र सरकारच्या दडपशाहीमुळं, तपास यंत्रणांच्या गैरवापरामुळं देशातील राजकीय पक्षांना राजकारण कठीण झालं असताना काँग्रेसनं भारत जोडो यात्रा काढली, असं ते म्हणाले. 'देशातील कोणत्याही प्रादेशिक भाषांवर गंडातर येऊ देणार नाही. प्रादेशिक भाषांवर हल्ला हा भारतावर हल्ला आहे, असंही त्यांनी ठणकावलं.

राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यालाही हात घातला. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना न्याय्य वागणूक मिळाली पाहिजे. त्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. मात्र, भाजप ते करू इच्छित नाही. काँग्रेस सत्तेवर आल्यावर आम्ही ते करू, असं आश्वासन त्यांनी दिलं.

राहुल गांधी हे दहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून या दरम्यान ते सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क इथं कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.