मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत, राज ठाकरेंचा वर्मावर घाव

Raj Thackeray : अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत, राज ठाकरेंचा वर्मावर घाव

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 30, 2023 11:18 PM IST

Raj Thackeray on ajit pawar : अजित पवार म्हणतात आता माझ्याकडे एकच आमदार आहे. अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई –मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यामध्ये बोलताना त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर सडेतोड भूमिका मांडली. पक्ष म्हटल्यावर चढ-उतार हे येतच असतात. माझ्यावर टीका करणारे अजित पवार हे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत, असा जहरी टोला राज यांनी अजित पवारांना लगावला.

राज ठाकरेंनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. त्यामध्ये उद्धव ठाकरे व मातोश्रीबरोबरचे संबंध, बारसू रिफायनरी, मनसेची वाटचाल, सध्याचे राजकारण यावर त्यांनी भाष्य केलं. अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत विचारल्यावर राज म्हणाले की, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की, ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत. मात्र ते अन्य आमदारांना निवडून आणू शकत नाहीत. मी माझा स्वतःचा पक्ष काढला होता, त्यामधून १३ आमदार निवडून आणले. पण अजित पवार म्हणतात आता माझ्याकडे एकच आमदार आहे. अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत.

या टर्ममध्ये शिवसेनेच्या दोन नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या दोघांपैकी कोण शपथ घेताना बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं असं वाटतं. या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असे बाळासाहेबांचे स्वप्न नव्हतेच. महाराष्ट्र बलशाली व्हावा असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. त्यामुळे दोघांपैकी कुणीही शपथ घेताना बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्याचं वाटलं नाही.

उद्धव ठाकरेंबरोबरच्या संबंधावर राज ठाकरे म्हणाले की, खूप छान दिवस होते ते, माहित नाही मला कुणी विष कालवलं, किंवा कुणी नजर लावली ती.

IPL_Entry_Point