मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  द्रौपदी मुर्मू यांचा झाला होता प्रेमविवाह; हुंड्यात मिळाले गाय, बैल अन्..

द्रौपदी मुर्मू यांचा झाला होता प्रेमविवाह; हुंड्यात मिळाले गाय, बैल अन्..

Jul 18, 2022, 04:41 PM IST

    • राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu )यांचा ४२ वर्षांपूर्वी श्याम चरण मुर्मू या आदिवासी तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. द्रौपदी मुर्मू यांचे लग्नापूर्वीचे नाव द्रौपदी टुडू असे होते.
द्रौपदी मुर्मू यांचा झाला होता प्रेमविवाह

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu)यांचा ४२ वर्षांपूर्वी श्याम चरण मुर्मू या आदिवासी तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. द्रौपदी मुर्मू यांचे लग्नापूर्वीचे नाव द्रौपदी टुडू असे होते.

    • राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu )यांचा ४२ वर्षांपूर्वी श्याम चरण मुर्मू या आदिवासी तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. द्रौपदी मुर्मू यांचे लग्नापूर्वीचे नाव द्रौपदी टुडू असे होते.

नवी दिल्ली -  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election 2022) आज मतदान होत आहे. या निवडणुकीत द्रोपदी मुर्मू (Draupadi murmu )आणि यशवंत सिन्हा राष्ट्रवतीपदाचे उमेदवार असून निवडणुकीसाठी चुरशीने मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती म्हणून विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती (Presidential Election 2022 ) आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या नेत्या असतील ज्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील. मात्र तुम्हाला माहीत नसेल की, याच द्रौपदी मुर्मू यांचा ४२ वर्षांपूर्वी श्याम चरण मुर्मू या आदिवासी तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. द्रौपदी मुर्मू यांचे लग्नापूर्वीचे नाव द्रौपदी टुडू असे होते. लग्नानंतर त्या द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu )झाल्या आणि पहाडपूर हे गाव द्रौपदी टुडू यांचे सासर बनले.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

भुवनेश्वरमध्ये पदवीचे शिक्षण घेताना झाली दोघांची भेट -

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu )यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण भुवनेश्वरमध्ये झाले आहे. १९६९ ते १९७३ दरम्यान आदिवासी निवासी शाळेत शिक्षण घेतलेल्या मुर्मू यांनी नंतर पदवीसाठी भुवनेश्वरच्या रमा देवी महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. याच दरम्यान त्यांची भेट शाम चरण मुर्मू यांच्याशी झाली. शाम चरण हे देखील याच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. काही दिवसांतच दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

लग्नाच्या मागणीसाठी शाम चरण यांचा द्रौपदी यांच्या गावात तीन दिवस मुक्काम -

दरम्यान, शाम चरण हे १९८० मध्ये लग्नाचा प्रस्ताव घेऊन द्रौपती मुर्मू यांच्या गावी गेले. यावेळी त्यांनी सोबत काही नातेवाईकांनाही नेले होते. त्यांनी तीन दिवस वरवाडा गावात आपला तळ ठोकला होता. मात्र, द्रौपती मुर्मू यांचे वडिल बिरंची नारायण टुडू यांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. अखेर नातेवाईकांनी समजवल्यानंतर त्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिला.

मुलाच्या कुटूंबाकडून मुलीला हुंडा देण्याची प्रथा -

द्रौपदी टुडू आणि शाम चरण मुर्मू हे दोघेही संथाल समाजातून येतात. या समाजातील पंरपरेनुसार मुलाच्या कुटुंबाकडून मुलीच्या कुटुंबाला हुंडा दिला जातो. तो किती द्यायचा हे मुली आणि मुलाचे कुटुंबीय बसून ठरवतात. त्यावेळी दोघांच्याही परिवारांमध्ये झालेल्या चर्चेतून एक गाय, बैल आणि १६ जोड्या कपडे देण्याचे ठरले. शाम चरण मुर्मू यांनी त्याला होकार दिला होता.

मुलं व पतीच्या मृत्यूनंतर घरात भरवली शाळा -

पहाडपूर गावात असणाऱ्या मुर्मू यांच्या सासरच्या घरात श्याम लक्ष्मण शिपून उच्च प्राथमिक शाळा भरते. ही इमारतीत पूर्वी द्रौपदी मुर्मू यांचे कुटूंबीय रहात होते. मात्र, मुलं आणि पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी या इमारतीचे शाळेत रुपांतर केले. द्रौपदी मुर्मू या मुलांच्या आणि पतीच्या पुण्यतिथीला येथे नक्की येतात.