मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : वाळू माफियांची मुजोरी.. महिला अधिकाऱ्याला फरफटत नेत काठीने मारहाण, ४४ जणांना अटक

VIDEO : वाळू माफियांची मुजोरी.. महिला अधिकाऱ्याला फरफटत नेत काठीने मारहाण, ४४ जणांना अटक

Apr 17, 2023, 11:42 PM IST

  • sand mafia in bihar : अवैध वाळू व्यावसायिकांविरोधात छापा टाकण्यासाठी गेलेल्या खनिकर्म विभागाच्या पथकावर सोमवारी दुपारी वाळू माफियांनी हल्ला केला. सुमारे १०० जणांनी खाण अधिकारी आणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत दगडफेक केली.

पोलिसांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक

sandmafiainbihar : अवैध वाळू व्यावसायिकांविरोधात छापा टाकण्यासाठी गेलेल्या खनिकर्म विभागाच्या पथकावर सोमवारी दुपारी वाळू माफियांनी हल्ला केला.सुमारे१००जणांनी खाण अधिकारी आणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत दगडफेक केली.

  • sand mafia in bihar : अवैध वाळू व्यावसायिकांविरोधात छापा टाकण्यासाठी गेलेल्या खनिकर्म विभागाच्या पथकावर सोमवारी दुपारी वाळू माफियांनी हल्ला केला. सुमारे १०० जणांनी खाण अधिकारी आणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत दगडफेक केली.

बिहारमध्ये वाळू माफियांचा नंगानाच सुरू आहे. राजधानी पाटण्याला लागून असलेल्या बिहटाच्या पारव येथील कोइलवार पुलावर अवैध वाळू व्यावसायिकांविरोधात छापा टाकण्यासाठी गेलेल्या खनिकर्म विभागाच्या पथकावर सोमवारी दुपारी वाळू माफियांनी हल्ला केला. सुमारे १०० जणांनी खाण अधिकारी आणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत दगडफेक केली. आरोपींनी खाणविभागाच्या महिलाअधिकाऱ्याला जमिनीवरून फरफटत ओढत नेत मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

आरोपी पोलिसांवरही धावून गेले व पोलीस गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेत जिल्हा खनिकर्म विकास अधिकारी कुमार गौरव आणि दोन महिला खाण निरीक्षक सय्यद फरहीन आणि अम्या कुमारी गंभीर जखमी झाले आहेत.तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्धा तास घटनास्थळी गोंधळ सुरू होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई सुरू केली. एसएसपी राजीव मिश्रा यांनी सांगितले की, याप्रकरणी ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतरांना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार,जिल्हा खनिकर्म अधिकारी कुमार गौरव आणि खनिकर्म निरीक्षक सय्यद फरहीन आणि अम्या कुमारी हे वाळू व्यावसायिकांवर कारवाईसाठी सोमवारी दुपारी२.४५वाजता कोइलवार पुलावर पोहोचले होते.त्यांच्यासोबत सहा पोलिस कर्मचारीही होते.खनिकर्म विभागाच्या पथकाने अवैध वाळूने भरलेल्या ट्रकवर कारवाईस सुरूवात केली. यानंतरअचानक१०० जणांचा जमाव जमला व त्यांनीखाण अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

संख्याबळ कमी असल्याने हल्लेखोर जमावासमोर अधिकारी आणि पोलीस हतबल झाले. दुसरीकडे वाळू माफिया आणि त्यांच्या साथीदारांनी काठ्या, दगडांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. खाण खात्याच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. वाळू माफियांनी महिला खाण अधिकाऱ्याला ओढत नेऊन मारहाण केली आणि दगडफेक केली. याच वाळू माफिया आणि त्यांच्या टोळ्यांनी इतर खाण अधिकारी आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. त्यांच्या वाहनांचेही नुकसान केले.

 

घटनेनंतर पोलिसांनी छापे टाकून ४४ आरोपींना अटक केली असून अवैध उत्खननात गुंतलेली ५० वाहने जप्त केली आहेत.

विभाग