मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SBI च्या एटीएममधून पैसे काढणं झालं किचकट; काय आहे नवा नियम?

SBI च्या एटीएममधून पैसे काढणं झालं किचकट; काय आहे नवा नियम?

May 20, 2022, 02:01 PM IST

    • स्टेट बँक ऑफ इडियाच्या ग्राहकांना आता एटीएममधून पैसे काढायचे असल्यास आता पीन नंबर व्यतिरिक्त आणखी एक नंबर टाकावा लागणार आहे. 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम (हिंदुस्तान टाइम्स)

स्टेट बँक ऑफ इडियाच्या ग्राहकांना आता एटीएममधून पैसे काढायचे असल्यास आता पीन नंबर व्यतिरिक्त आणखी एक नंबर टाकावा लागणार आहे.

    • स्टेट बँक ऑफ इडियाच्या ग्राहकांना आता एटीएममधून पैसे काढायचे असल्यास आता पीन नंबर व्यतिरिक्त आणखी एक नंबर टाकावा लागणार आहे. 

जर तुम्ही एसबीआय म्हणजेच देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक आहात आणि तुम्हाला एटीएममधून पैसे काढायचे असतील तर तुम्ही सेव्ह केलेला पीन नंबर आता पुरेसा नसेल. एसबीआयने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एक नवा नियम अमलात आणला आहे. या नियमानुसार फक्त पीन नंबर घालून पैसे आता तुम्ही काढू शकणार नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जायेत खिल्ली, VIDEO

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

काय आहे नवा नियम?

आपल्या खातेदारांच्या सुरक्षेसाठी एसबीआयने एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांना आता एटीएममधून पैसे काढताना फक्त पीन नंबर टाकणं गरजेचं ठेवलं नाहीय तर आता पीन नंबर बरोबरच आणखी एक नंबर तुम्हाला टाकावा लागणार आहे. तो नंबर म्हणजे ओटीपी.

१० हजारांपेक्षा अधिक रक्कम जर तुम्हाला एटीएमद्वारे काढायची असेल तर पीन नंबर सोबतच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक पीन नंबरच्या खाली टाकायचा आहे.तो क्रमांक टाकल्यावरच तुम्हाला तुमचे पैसे एटीएममधनं काढता येणार आहेत.

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं म्हणणं आहे. वाढती सायबर गुन्हेगारी आणि त्यानं लोकांचं होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बँकेने हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. तशा आशयाचं एक ट्विटही एसबीआयनं केलं आहे.

ग्राहकांना सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण देणे ही आमची प्राथमिकता असल्याचे एसबीआयने म्हटले. ग्राहकाला १० हजारांहून अधिक रक्कम एटीएममधून काढायची असेल तर त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. त्यानंतर ओटीपी आणि पीन क्रमांक नमूद करावा लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला एटीएममधून पैसे काढता येणार आहे.

कसे काढाल पैसे?

एसबीआयच्या एटीएममध्ये आधी तुमचं कार्ड प्रविष्ट करा

मग ओटीपी या पर्यायावर क्लीक करा

तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाका

त्या खालोखाल तुमचा पीन नंबर टाका 

किती पैसे हवेत त्याची माहिती टाका

ओके करा आणि पैसे मिळवा