मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Instagram Down : इन्स्टाग्रामची सेवा अचानक ठप्प, लाखो नेटकऱ्यांच्या ऑनलाईन तक्रारी

Instagram Down : इन्स्टाग्रामची सेवा अचानक ठप्प, लाखो नेटकऱ्यांच्या ऑनलाईन तक्रारी

May 22, 2023, 09:30 AM IST

    • Instagram Down Today : इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाल्यामुळं लाखो नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कंपनीविरोधात तक्रारी करायला सुरुवात केली आहे.
instagram down today news (REUTERS)

Instagram Down Today : इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाल्यामुळं लाखो नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कंपनीविरोधात तक्रारी करायला सुरुवात केली आहे.

    • Instagram Down Today : इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाल्यामुळं लाखो नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कंपनीविरोधात तक्रारी करायला सुरुवात केली आहे.

instagram down today news : सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळपासून भारतासह जगभरात इन्स्टाग्राम ठप्प झालं आहे. त्यानंतर आता जगभरातील लाखो नेटकऱ्यांनी ट्वीटर आणि फेसबुकवर इन्स्टाग्राम बंद पडल्याच्या तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आता इन्स्टाग्राम वापरता येत नसल्यामुळं चाहत्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डाउनडेटेक्टरनुसार गेल्या दोन तासांपासून इन्स्टाग्राम बंद पडलं असून त्यानंतर अनेकांना लॉगिन करण्यात अडथळे येत आहे. तसेच इन्स्टाग्राम ओपनच होत नसल्यामुळं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कंपनीविरोधात संताप व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

Vande Bharat Metro : वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर, लवकरच होणार लाँच; पाहा VIDEO

IRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; पगार १ लाख ४० हजार!

इंन्टाग्राम बंद पडल्याचं समजताच जवळपास १ लाख ८० हजार नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्राम कंपनीविरोधात तक्रारी केल्या आहे. काल रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास देखील इन्स्टाग्राम डाऊन झालं होतं. त्यानंतर आता आज सकाळपासून इन्स्टाग्राम पुन्हा बंद पडल्यामुळं नेटकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अमेरिकेत एक लाख, कॅनडात २४ हजार आणि इंग्लंडमध्ये ५६ हजार लोकांनी इन्स्टाग्राम वापरण्यात अडचणी येत असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं आहे. त्यानंतर आता खुद्द इन्स्टाग्रामने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत कंपनीच्या प्रवक्त्याने ई-मेलद्वारे 'लवकरात लवकर इन्स्टाग्राम सुरू करण्यात येणार' असल्याचं म्हटलं आहे.

गेल्या आठवड्याभरात इन्स्टाग्राम बंद पडण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी १८ मे रोजी तासाभरासाठी इन्स्टाग्राम बंद पडलं होतं. त्यानंतर काल संध्याकाळी नेटकऱ्यांना इन्स्टाग्राम वापरण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर आता आज सकाळपासून इन्स्टाग्राम बंद पडल्याने अनेकांना त्यावर स्टोरी शेयर करता येत नाहीय, तसेच व्हिडिओ पाहणं, स्टोरी चेक करणं आणि रिल्स पाहण्यातही नेटकऱ्यांना अडचणी येत आहे. त्यामुळं लाखो वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्रामविरोधात तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

विभाग