मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ढोकळा खाताना लागला ठसका अन् गेला जीव; डॉ. तरुणीची लग्नादिवशीच निघाली अंत्ययात्रा

ढोकळा खाताना लागला ठसका अन् गेला जीव; डॉ. तरुणीची लग्नादिवशीच निघाली अंत्ययात्रा

May 20, 2022, 10:11 PM IST

    • एका डॉक्टर तरुणीची लग्नाच्या वरातीऐवजी तिची अंत्ययात्राच काढण्याची दुर्दैवी वेळ कुटूंबावर आली. तरुणीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला ढोकळा.
प्रतिकात्मक छायाचित्र

एका डॉक्टर तरुणीची लग्नाच्या वरातीऐवजी तिची अंत्ययात्राच काढण्याची दुर्दैवी वेळ कुटूंबावर आली. तरुणीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला ढोकळा.

    • एका डॉक्टर तरुणीची लग्नाच्या वरातीऐवजी तिची अंत्ययात्राच काढण्याची दुर्दैवी वेळ कुटूंबावर आली. तरुणीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला ढोकळा.

भोपाळ – जर एखाद्या घरात मंगलप्रसंगी कोणाचा मृत्यू झाला तर संपूर्ण घरावर शोककळा पसरली जाते, मात्र जर लग्नादिवशीच नवरदेव किंवा नवरीचा मृत्यू झाल्यास या दु:खाची तीव्रता अधिक असते. अशा अनेक घटना दररोज कुठे ना कुठे घडत असतात. अशीच एक घटना मुंबईतील डॉक्टर तरुणीच्या बाबतीत घडली आहे.  

ट्रेंडिंग न्यूज

Parcel bomb in Gujrat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

घरात लगीनघाई सुरू होती. लग्न एक दिवसावर येऊन ठेपले होते. संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होणार होता. सर्व तयारी झाली होती. जवळचे सर्व नातेवाईक जमले होते. माहेरच्या घरात तिचा शेवटचा दिवस असल्याने तिचे कोडकौतुक सुरू होते. सर्वजण तिचे लाड पुरवत होते. पण हा दिवस तिचा फक्त माहेरच्या घरातील नव्हे तर तिच्या आयुष्यातील व या जगातील शेवटचा दिवस ठरेल. याची कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र एका डॉक्टर तरुणीची लग्नाच्या वरातीऐवजी तिची अंत्ययात्राच काढण्याची दुर्दैवी वेळ कुटूंबावर आली.

तरुणीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला ढोकळा. नाश्त्यात ढोकळा खाल्ल्यानंतर नवरी मुलीली जोराचा ठसका लागला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे   मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील ही घटना आहे.

मृत तरुणीचे नाव मेधा प्रमोद काळे असे आहे. ती एक डॉक्टर होती. मुंबईत तिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलं होतं.  मुंबईतच ती प्रॅक्टिस करत होती. आज (२० मे) तिचे लग्न होणार होते. लग्नासाठी म्हणून ती आपल्या गावी मध्य प्रदेशला गेली होती.

लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे १९ मे रोजी तिने सकाळी नाश्त्यात ढोकळा खाल्ला. ढोकळा खाताना तो तिच्या गळ्यात अडकला. त्यामुळे ती पाणी प्यायली. त्यानंतर तिला ठसका लागला. बराच वेळ ती खोकत होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर तिची प्रकृती जास्त बिघडली. तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला अन् एक संसार सुरू होण्यापूर्वीच उजाडला गेला.

हळदी कार्यक्रमादिवशीच डॉक्टर नवरीचा मृत्यू झाल्याने कुटूबाला मोठा धक्का बसला आहे. लग्नामुळे आनंदाचे वातावरण शोकाकुल झाले. ज्या लेकीची सासरी पाठवणी करायची होती. तिने जगाचाच कायमचा निरोप घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नाच्या आदल्या दिवशीच तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.