मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 24 May 2023: मी नार्को टेस्टला तयार, पण आधी आरोप करणाऱ्यांची नार्को करा - बृजभूषण सिंह
Live News Updates (HT)

Live News Updates 24 May 2023: मी नार्को टेस्टला तयार, पण आधी आरोप करणाऱ्यांची नार्को करा - बृजभूषण सिंह

May 24, 2023, 05:40 PMIST

Brij Bhushan Sharan Singh : कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी नार्को चाचणीची तयारी दर्शवली आहे. मात्र, आधी माझ्यावर आरोप करणाऱ्या खेळाडूंची नार्को करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

May 24, 2023, 05:40 PMIST

Brij Bhushan Sharan Singh : मी नार्को टेस्टला तयार, पण आधी आरोप करणाऱ्यांची नार्को करा - बृजभूषण सिंह

कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी नार्को चाचणीची तयारी दर्शवली आहे. मात्र, आधी माझ्यावर आरोप करणाऱ्या खेळाडूंची नार्को करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरही ते उपोषण का करत आहेत, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

May 24, 2023, 03:38 PMIST

मुंबईः अंबादास दानवे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार विश्वजित कदम व अनिकेत तटकरे उपस्थित होते.

मुंबईः अंबादास दानवे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
मुंबईः अंबादास दानवे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

May 24, 2023, 03:30 PMIST

Arvind Kejriwal in Mumbai : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

Arvind Kejriwal meets Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मुंबईत 'मातोश्री' निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संजय सिंह, सुभाष देसाई आदी नेते यावेळी उपस्थित होते.

AAP-Shiv Sena Meeting
AAP-Shiv Sena Meeting

May 24, 2023, 12:28 PMIST

उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘मातोश्री’वर दाखल 

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या मुंबई दौऱ्यावर असून आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. केजरीवाल हे ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले आहे.

May 24, 2023, 09:41 AMIST

Pune : पुण्यातील  विश्रांतवाडीत काँग्रेस पदाधिकाऱ्याची आत्महत्या

विश्रांतवाडीतील काँग्रेस पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. विकास शिवाजी टिंगरे (वय ४९, रा. पोरवाल रस्ता, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. विकास टिंगरे विश्रांतवाडी ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. टिंगरे यांनी पोरवाल रस्त्यावरील एका पतसंस्थेच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहितीची मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. टिंगरे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. विश्रांतवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

विकास शिवाजी टिंगरे
विकास शिवाजी टिंगरे

May 24, 2023, 09:00 AMIST

नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करावं, विरोधी पक्षांची मागणी

देशातील अनेक विरोधी पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर चर्चा केली असून लवकरच संयुक्त वक्तव्य जारी केलं जाणार आहे. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी संसद भवनाचं उद्घाटन करावं, अशी त्यांची मागणी आहे. लोकसभा सचिवालयातून प्रसिद्ध झालेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार, २८ मे रोजी दुपारी १२ वाजता उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत.

May 24, 2023, 08:53 AMIST

Delhi News : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पत्रकार परिषद

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सकाळी ११.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत.  

May 24, 2023, 08:52 AMIST

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा दिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांच्या बरोबर द्विपक्षिय चर्चा करतील.  

May 24, 2023, 08:51 AMIST

Samir Wankhde : समीर वानखेडेंची आज पुन्हा सीबीआय चौकशी

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५  कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांना सीबीआयनं आज बीकेसीतील मुख्यालयात पुन्हा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांची आज पुन्हा चौकशी केली जाणार आहे. 

May 24, 2023, 08:33 AMIST

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली  पक्षातील खासदारांची बैठक

उद्धव ठाकरे लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढाव घेत आहेत. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित केलाय. दरम्यान, आज रात्री ८  वाजता वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली असून यात ते  लोकसभा निहाय कामाचा आढावा घेणार आहेत.

May 24, 2023, 08:31 AMIST

दिल्लीचे मुख्यमंत्री दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये वाव देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला, हाच केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवालांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटीची मोहिम हाती घेतली आहे त्या अंतर्गत केजरीवाल आज उद्धव ठाकरे दुपारी 4  वाजता तर आज शरद पवारांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत.

May 24, 2023, 07:16 AMIST

Mumbai Blast Threat Call: ट्विटर वरून बॉम्ब हल्ल्याची धमकी देणं भोवलं ! आरोपी तरुणाला नांदेडमधून मध्यरात्री केली अटक

Mumbai Blast Threat Call: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली जात आहे. मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून बॉम्बहल्ल्याची धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी नांदेडमधून अटक केली.

May 24, 2023, 05:58 AMIST

CM Eknath Shinde : मेहकर एसटी अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये

सिंदखेडाराजा येथील पळसखेडी चक्का गावाजवळ आज सकाळी पुणे ते मेहकर एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा जण मृत्युमुखी पडले असून दहा जखमी आहेत. मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये तत्काळ द्यावेत तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या अपघाताविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे निर्देश दिले.

May 24, 2023, 05:57 AMIST

Pune : वारजे वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

 वारजे वाहतूक विभागाच्या हद्दीत कै. जनार्दन पाटलु चौधरी उद्यान लगतच्या महावितरण मेन डीपी पर्यंत सुमारे ३५ मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ४ जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

May 24, 2023, 05:56 AMIST

 पंढरपूर मंदिर विकास, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

 राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजीटल मॅपींग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरीत करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

May 24, 2023, 05:55 AMIST

Pune : परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

 पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी (पी.एच.डी.) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी २० जून २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी क्यूएस जागतिक रँकिंग ३०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

May 24, 2023, 05:54 AMIST

2000 notes exchange :  दोन हजारांची नोट बदलण्यासाठी लागेल तब्बल अडीच कोटी तास; कॉँग्रेसची टीका

2000 notes exchange : आरबीआयच्या नोटबंदीच्या निर्णयावर कॉंग्रेसने जहरी टीका केली आहे. कॉँग्रेसचे प्रवक्ता गौरव वल्लभ म्हणाले की, जर एक व्यक्ति पाच नोटा एका वेळेला बदलत असेल तर पूढील चार महिन्यात बँकांना ३६ कोटी व्यवहार करावे लागतील याला तब्बल अडीच कोटी तास लागतील असा अजब दावा त्यांनी केला आहे.

    शेअर करा