मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 20 April 2023 : ठाकरे सरकारच्या कृतीमुळंच कोर्टाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळली- मुख्यमंत्री
Maharashtra Chief Minister Eknath Shinde (ANI)

Live News Updates 20 April 2023 : ठाकरे सरकारच्या कृतीमुळंच कोर्टाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळली- मुख्यमंत्री

Apr 20, 2023, 11:47 PMIST

Maratha Reservation Review Petition : मराठा आरक्षणावर राज्य सरकारकडून दाखल करण्यात आलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

Apr 20, 2023, 11:43 PMIST

Maratha Reservation : ठाकरे सरकारच्या कृतीमुळंच मराठा आरक्षणाची याचिका कोर्टाने फेटाळली- मुख्यमंत्री शिंदे

Maratha Reservation Review Petition : मराठा आरक्षणावर राज्य सरकारकडून दाखल करण्यात आलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळं आता यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत सापडण्याची चिन्हं आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारला जबाबदार धरलं आहे. न्या. भोसले कमिटीनं फेरविचार याचिकेमध्ये कोणताही स्कोप नसल्याचं म्हटलं होतं. तरी देखील ठाकरे सरकारने सरकारने याचिका कशासाठी दाखल केली होती?, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी मविआवर निशाणा साधला आहे.

Apr 20, 2023, 07:48 PMIST

Raj Thackeray : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, खारघरमधील दुर्घटनेवर झाली चर्चा

Raj Thackeray Meet Eknath Shinde : महाराष्ट्र नवननिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये खारघरमधील दुर्घटना आणि अजित पवारांच्या पक्षांतराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Apr 20, 2023, 05:58 PMIST

Apple store Delhi : अॅपलचे भारतातील दुसरे स्टोअर दिल्लीत खुले

Apple चे भारतातील दुसरे अधिकृत स्टोअर दक्षिण दिल्लीतील साकेत येथे उघडले आहे. सीईओ टीम कुक यांनी सकाळी १० वाजता कंपनीचे दुसरे स्टोअर उघडले. अॅपलचे २५ देशांमध्ये ५०० पेक्षा जास्त अधिकृत स्टोअर्स आहेत. सर्वाधिक २७२ स्टोअर्स अमेरिकेत आहेत. टीम कुकने स्टोअर उघडल्यानंतर लोकांना भेटले आणि फोटोही काढले. तत्पूर्वी, त्यांनी १८  एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत ऍपलच्या पहिल्या फ्लॅगशिप रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये हे स्टोअर बनवण्यात आले आहे.

Apr 20, 2023, 05:30 PMIST

Coinswitch :  जम्प.ट्रेडचा कॉईनस्विचसह सहयोग

डिग्री डिजिटल कलेक्टिबल तंत्रज्ञान सक्षम व्यासपीठ गार्डियनलिंकच्या प्रमुख एनएफटी बाजारस्थळ जम्प.ट्रेडने कॉईनस्विच या भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो गुंतवणूक व्यासपीठासोबत सहयोगाची घोषणा केली. जम्प.ट्रेडचा आगामी गेम रॅडडीएक्स रेसिंग मेटाव्हर्समधील वेब३ क्षेत्रात जाहिरात करण्यासाठी ब्रॅण्ड्सकरिता अद्वितीय तत्त्वाच्या माध्यमातून कॉईनस्विचने हा सहयोग केला आहे.

Apr 20, 2023, 05:21 PMIST

‘खारघर’ घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची अजित पवारांची मागणी 

‘खारघर’ घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राज्य सरकारवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी पवार यांची राज्यपालांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Apr 20, 2023, 04:42 PMIST

Closing bell ; शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक, तीन दिवसानंतर हिरव्या रंगात बंद झाले सेन्सेक्स निफ्टी

शेअर बाजारात सलग तीन दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला. सेन्सेक्स निफ्टी आज हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्समध्ये आज ६४ अंशांच्या वाढीसह ५९,६३२ आणि निफ्टी ५ अंशांच्या वाढीसह १७,६२४ अंशांवर बंद झाले. निफ्टीच्या ५० पैकी २६ स्टाॅक्समध्ये तेजी तर २३ स्टाॅक्समध्ये घसरण झाली. निफ्टीच्या टाॅप गेनर्समध्ये एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, बजाज आॅटो, टाटा मोटर्ससारख्या स्टाॅक्सचा समावेश होता. तर दिवीस लॅब, हिंदुस्तान यूनिलिव्हर, डाॅक्टर रेड्डी, आयशर मोटर्स, हिंदाल्को टाॅप लूजर्समध्ये होते.

Apr 20, 2023, 04:23 PMIST

Pune University : पुणे विद्यापीठात रॅप साँगचं शूटिंग; अजित पवार यांचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना पत्र

 पुणे विद्यापीठातील कुलगुरूंच्या खुर्चीवर बसून अश्लील भाषेतील रॅप साँग चित्रीत केल्याच्या प्रकारावरून सध्या गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून याचा निषेध केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भविष्यात असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी पत्राद्वारे केलं आहे.

Apr 20, 2023, 03:40 PMIST

Pune rain :  पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात 

वादळी वाऱ्यासह पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे.  गेले दोन दिवस उन्हाचा चटका वाढला आहे. परिणामी आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास  पुणे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.  सिंहगड रोड, खडकवासला येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. कोथरुडमध्ये अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याचे वृत्त आहे. 

Apr 20, 2023, 03:03 PMIST

Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना करोनाची लागण

Rajnath Singh tests Covid Positive : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना करोनाची लागण झाली आहे. राजनाथ यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं दिसत असून ते सध्या आपल्या सरकारी निवासस्थानी विलगीकरणात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Apr 20, 2023, 02:44 PMIST

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री गोव्यात येणार

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी येत्या ४-५ मे रोजी गोव्यात येणार आहे. शांघाई कोऑपरेशन ऑरगनायजेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भुट्टो गोव्याला येणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या निमंत्रणावरून बिलावल भुट्टो गोव्याला येणार आहेत.

Pakistani Foreign Minister Bilawal Bhutto Zardari
Pakistani Foreign Minister Bilawal Bhutto Zardari (AP)

Apr 20, 2023, 01:55 PMIST

Audi :  जानेवारी ते मार्च दरम्यान आॅडीच्या विक्रीत १२६  टक्के वाढ

ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने २०२३ च्या पहिल्या तिमाहीत प्रबळ विक्री गती कायम ठेवत जानेवारी ते मार्च २०२३ कालावधीमध्ये १,९५० युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८६२ युनिट्सची विक्री करण्यात आली होती. यंदा विक्रीमध्ये १२६ टक्क्यांच्या वाढीची नोंद करण्यात आली असून यामधून गेल्या सहा वर्षांमधील प्रबळ तिमाही विक्री दिसून येते.

Apr 20, 2023, 01:54 PMIST

Malabar Gold : अक्षय्य तृतीयेनिमित्त मलाबार गोल्डकरुन मोफत सोन्याचे नाणे 

अक्षय्य तृतीया हा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे हे भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या सोहळ्याची शोभा आणि चकाकी वाढवण्यासाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने अक्षय्य तृतीया सोन्याचे दागिन्यांचे विशेष कलेक्शन प्रस्तुत केले आहे. खास घडवलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या या कलेक्शनसह, ग्राहक या अक्षय्य तृतीयेला घराघरात सौभाग्य आणू शकतात.

ग्राहकांना ३०,००० रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या दागिन्यांच्या खरेदीवर १०० मिलीग्राम सोन्याचे नाणे आणि हिरे, रत्न आणि पोल्की दागिन्यांच्या खरेदीवर २५० मिलीग्राम सोन्याचे नाणे भेट रूपात मिळतील. ही ऑफर १८ मार्चला सुरू होऊन, ती ३० एप्रिल २०२३ पर्यंत वैध आहे.

Apr 20, 2023, 01:16 PMIST

Twitter Blue Tick : ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक वाचवण्यासाठी आज शेवटचा दिवस

लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter वर केलेल्या प्रमुख बदलांमध्ये ब्लू टिक काढून टाकण्याच्या निर्णयाचाही समावेश होता. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ब्लू टिकसाठी पैसे भरण्याची अंतिम मुदत २० एप्रिल आहे. या तारखेपर्यंत पैसे न देणाऱ्यांची ब्लू टिक गायब होणार आहे.

Apr 20, 2023, 11:46 AMIST

PNG and Sons : पीएनजी सन्सने पार केली दहा हजार कोटींहून अधिकची उलाढाल

भारतातील आघाडीची रिटेल ज्वेलरी कंपनी पीएनजी सन्स (पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि)ने एक अब्जपेक्षा अधिक डॉलरच्या किमती एवढ्या उलाढालीचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच, अशी कामगिरी करणारा महाराष्ट्रातील रिजनल रिटेल ज्वेलरी क्षेत्रातील पहिलाच ब्रँड आहे. कामगिरीबाबत कंपनीचे संचालक-सीईओ अमित मोडक म्हणाले, ‘कंपनीचे संस्थापक अजित गाडगीळ आणि डॉ. रेणू गाडगीळ यांनी कंपनीच्या टीमवर विश्वास दाखविला आहे. त्यामुळेच आव्हानात्मक परिस्थितीत कंपनीची विक्री व मार्जीनबाबतची कामगिरी उत्तम झाली आहे. परिणामी पीएनजी गाडगीळ कुटुंबातील सर्वांत तरुण व सर्वंत मोठी कंपनी बनली आहे.’

Apr 20, 2023, 11:04 AMIST

Pune : हवामानशास्त्र विभागाकडील हवामान अंदाजविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येणारे हवामान अंदाज, पर्जन्यमान अंदाजविषयक सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. हवामानशास्त्र विभागाकडील माहितीचा आरोग्य विभागाला चांगला उपयोग करुन घेता येईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

Apr 20, 2023, 08:12 AMIST

Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची जल संघर्ष यात्रा रोखली

Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Apr 20, 2023, 07:27 AMIST

Pune : रांजनगाव एमआयडीसी मध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारणार 

 पुणे जिल्ह्यातील रांजनगाव एमआयडीसी मध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यात येईल असे राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात जाहीर केले. गुरुवारी उद्योगमंत्री उदय सामंत रांजनगाव एमआयडीसी मध्ये येऊन याबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

Apr 20, 2023, 07:26 AMIST

Nashik : नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे चित्र आज होणार स्पष्ट

नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे कुठे निवडणूक बिनविरोध होणार कुठे चुरशीची निवडणूक होणार हे आज स्पष्ट होणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना भाजप विरोधात महाविकास आघाडी अशी लढत आहे तर पिंपळगाव मध्ये महाविकास आघाडीचे २  प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटचे माजी आमदार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यांच्यात लढत आहे.

Apr 20, 2023, 07:25 AMIST

Mulund : सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आज मुलुंड कोर्टात होणार  हजर

 सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आज मुलुंड कोर्टात होणार का हजर? मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयानं जावेद अख्तर यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघा विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे.

Apr 20, 2023, 07:24 AMIST

Maharashtra sadan fraud :  महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज छगन भुजबळांसह सर्व ५२  आरोपी मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याची शक्यता

 कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज छगन भुजबळांसह सर्व ५२  आरोपी मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याची शक्यता. सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकांवर होणार सुनावणी.

Apr 20, 2023, 07:24 AMIST

हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. साजिद, आबीद आणि नाविद यांना ईडीच्या प्रकरणात अटकेपासून दिलेलं संरक्षणही आज संपणार आहे.

Apr 20, 2023, 07:23 AMIST

SRA fraud : एसआरए घोटाळा प्रकरणी  दाखल  याचिकेवर सुनावणी

कथित एसआरए घोटाळा प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. तूर्तास पेडणेकरांना हायकोर्टानं दिलाय अटकेपासून दिलासा.

 

Apr 20, 2023, 07:22 AMIST

Maharashtra bhushan : संभाजी ब्रिगेड पोलिसांत तक्रार देणार 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेली जीवित आणि वित्त हानी यासंदर्भात संभाजी ब्रिगेड पोलिसात तक्रार अर्ज देत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार आहेत.

Apr 20, 2023, 07:18 AMIST

MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सह्याद्री अतिथीगृह येथे  भेट घेणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सह्याद्री अतिथीगृह भेट घेणार आहेत. वरळी बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पात काही मागण्या घेऊन मनसेचे कार्यकर्ते आणि रहिवाश्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती, त्यानंतर आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट होणार आहे.

Apr 20, 2023, 07:16 AMIST

Election : कृषी बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीसाठी आज शेवटचा दिवस

राज्यातील कृषी बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीसाठी आज शेवटचा दिवस आहे. राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

Apr 20, 2023, 07:16 AMIST

sun eclipse 2023 : आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज सकाळी ७.४  ते १२.२९  पर्यंत होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. 

Apr 20, 2023, 07:13 AMIST

Rahul Gandhi :  सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना २३ मार्चला दोषी ठरवलं होतं. यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात जात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

    शेअर करा