मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  फॅमिली कोर्टात सोबत राहण्याचे वचन, बाहेर येताच पत्नीचा चिरला गळा

फॅमिली कोर्टात सोबत राहण्याचे वचन, बाहेर येताच पत्नीचा चिरला गळा

Aug 14, 2022, 03:38 PM IST

    • शिवकुमार याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी या गोष्टीचा तपास करत आहेत की, आरोपी कोर्टात चाकू घेऊन कसा पोहोचला. आरोपीने ज्या शस्त्राने पत्नीची हत्या केली, ते जप्त करण्यात आले आहे.
फॅमिली कोर्टात पत्नीची हत्या

शिवकुमार याच्या विरोधातहत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी या गोष्टीचा तपास करत आहेत की, आरोपी कोर्टात चाकू घेऊन कसा पोहोचला.आरोपीने ज्या शस्त्राने पत्नीची हत्या केली, ते जप्त करण्यात आले आहे.

    • शिवकुमार याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी या गोष्टीचा तपास करत आहेत की, आरोपी कोर्टात चाकू घेऊन कसा पोहोचला. आरोपीने ज्या शस्त्राने पत्नीची हत्या केली, ते जप्त करण्यात आले आहे.

कर्नाटकमध्ये फॅमिली कोर्टात एका व्यक्तीने पत्नीची गळा चिरून हत्या केली. येथे दोघे घटस्फोटासाठी अर्ज दिल्यानंतर काउंसलिंग सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कोर्ट परिसरात असणाऱ्या लोकांना त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. 

ट्रेंडिंग न्यूज

Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

दरम्यान हल्ल्यानंतर महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. काउंसलिंग सेशनमध्ये दोघे या गोष्टीवर सहमत झाले होते, की दोघे मतभेद व वाद विसरून पुन्हा एकत्र राहतील. दोघांचा सात वर्षापूर्वी विवाह झाला होता. 

'वॉशरूमपर्यंत पाठलाग करत गेला आरोपी '
आरोपी पतीचे नाव शिवकुमार आहे. तर मृत पत्नीचे नाव चैत्रा होते. ही घटना हासन जिल्ह्यातील होलेनरसीपुरा फॅमिली कोर्टात घडली. एक तासाच्या काउंसलिंग (समुपदेशन) नंतर महिला कार्टाच्या बाहेर येताच शिवकुमार तिचा पाठलाग करत वॉशरूमपर्यंत गेला. तेथे एकटीला पाहून त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. तेथे रक्तबंबाळ अवस्थेत टाकून आरोपीने तेथून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 

कोर्टात चाकू घेऊन कसा आला हल्लेखोर '
शिवकुमार याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. तो न्यायालयात चाकू घेऊन कसा काय दाखल झाला, याचा पोलीस तपास करत आहेत. आरोपीने ज्या शस्त्राने आपल्या पत्नीची हत्या केली, ते शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, तपासानंतर प्रकरणासंबंधित खुलासा होऊ शकतो. घटनास्थळावर उपस्थितीत असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींशी चौकशी केली जात आहे. 

विभाग