मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ज्यांना वर्गात बसू दिलं नव्हतं त्यांच्या नातीचा 'ऑक्सफर्ड प्रवास', तरुणीची आजोबांसाठी भावुक पोस्ट

ज्यांना वर्गात बसू दिलं नव्हतं त्यांच्या नातीचा 'ऑक्सफर्ड प्रवास', तरुणीची आजोबांसाठी भावुक पोस्ट

Sep 08, 2022, 09:12 AM IST

    • Juhi Kore's Post For Grandfather: महाराष्ट्रातील एका खेडेगावात जन्मलेल्या आजोबांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. मात्र दोन पिढ्यांमध्ये त्यांनी वास्तव बदलले आणि नातीने आज ऑक्सफर्डमध्ये पदवी मिळवलीय.
जुही कोरे

Juhi Kore's Post For Grandfather: महाराष्ट्रातील एका खेडेगावात जन्मलेल्या आजोबांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. मात्र दोन पिढ्यांमध्ये त्यांनी वास्तव बदलले आणि नातीने आज ऑक्सफर्डमध्ये पदवी मिळवलीय.

    • Juhi Kore's Post For Grandfather: महाराष्ट्रातील एका खेडेगावात जन्मलेल्या आजोबांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. मात्र दोन पिढ्यांमध्ये त्यांनी वास्तव बदलले आणि नातीने आज ऑक्सफर्डमध्ये पदवी मिळवलीय.

Juhi Kore's Post For Grandfather: सध्या सोशल मीडियावर आजोबा आणि नातीची एक प्रेरणादायी स्टोरी व्हायरल होत आहे. जुही कोरे हिनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून कम्पॅरिटिव्ह सोशल पॉलिटिक्समधून पदव्युत्तर पदवी घेतली. यानंतर तिने लिहिलेली लिंक्डइन पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. यामध्ये तिने तिच्या आजोबांना शिक्षणासाठी केलेला संघर्ष ते तिचं स्वप्न सत्यात येण्याची कथा यामध्ये लिहिलीय. आपल्या या यशाचं श्रेय तिनं आजोबांना दिलंंय. 

ट्रेंडिंग न्यूज

Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

जुहीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला पण प्रत्येकजण जगण्यासाठी स्वतंत्र नव्हता. त्यापैकीच महाराष्ट्रातल्या एका खेड्यात खालच्या जातीत जन्माला आलेला एका शाळेच्या वयाचा मुलगा. त्याच्या घरचे त्याला दोन कारणांमुळे शाळेत पाठवायला तयार नव्हते. कुटुंबात चार भावंडात मोठा असल्यानं काम करण्याची आणि दोन वेळच्या जेवणासाठी कमावण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. दुसरीकडे त्याला शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून शाळेत कशी वागणूक मिळेल याची भिती.

शाळा शिकण्याची इच्छा असणाऱ्या त्या विद्यार्थ्यांने पालकांना तयार केलं. गावातले लोक झोपेतून उठण्याआधी पहाटे ३ वाजता उठून शेतात काम करायचं. त्यानंतर सकाळी शाळेला जायचं. दुसऱ्या ज्या गोष्टीची भीती होती ती मात्र खरी ठरली. त्याला शाळेला जायला दीड किलोमीटर अनवाणी चालत जावं लागायचं. त्यानंतरही त्याला शाळेत वर्गात बसू दिलं जात नव्हतं असंही जुहीने सांगितलं.

जुहीने म्हटले की, मुलाने शेतात काम केलं तरी त्याचे पैसे मिळत नव्हते, त्या बदल्यात धान्य मिळायचं. त्यातून तो जुनी पुस्तकं घ्यायचा. अभ्यास करतानासुद्धा गावातील दिव्याखाली रात्री उशिरा सगळे झोपल्यावर बसायला लागायचं. वरच्या जातीतील लोकांकडून त्रासही व्हायचा. जातीवरून चीडवलं जायचं, वर्गाबाहेर बसायला लागायचं. हा सगळा त्रास सहन करूनही त्याने परीक्षा फक्त उत्तीर्ण केल्या नाही, तर वर्गातील इतर विद्यार्थ्यांना मागे टाकलं.

प्रत्येक हिरोचा प्रवासामागे महान गुरु असतात, तसे त्याच्या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी मुलाची प्रतिभा ओळखली आणि त्याला मोठ्या शहरात पाठवून त्याचा राहण्याचा आणि शाळेचा खर्च केला. स्वप्नांची नगरी समजल्या जाणाऱ्या मुंबईत इंग्रजी शिकायला गेला. तिथं कायद्याची पदवी घेतली. ही घेत असताना सरकारी इमारतीत सफाई कामगाराचं काम केलं. काही वर्षांनी मास्टर्स डीग्री घेतली आणि एक वरिष्ठ सरकारी अधिकारी म्हणून निवृत्त झाले. विशेष म्हणजे त्याच इमारतीत ते अधिकारी झाले जिथं सफाई कामगाराचं काम केलं. मला त्या मुलाचा, माझ्या आजोबांचा अभिमान असल्याचं जुहीने म्हटलं.

जुहीने पुढे सांगितलं की, “आज मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून मास्टर्स पूर्ण केलंय. दुर्दैवाने आज त्यांचं वर्षभरापूर्वी निधन झालं. ऑक्सफर्डच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला त्यांनी यावं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण मला माहितीय तो क्षण त्यांनी पाहिला असेल. दोन पिढ्यांमध्ये त्यांनी त्यांचं वास्तव बदललं, एकेकाळी वर्गात बसू न दिलेला मुलगा आणि त्यानंतर त्याच्या नातीने जगातील सर्वोत्तम विद्यापीठातून पदवी घेतली.” जुहीने शेअर केलेली ही लिंक्डइन स्टोरी आता शेअर केली जातेय. शिक्षणासाठी आजोबांनी केलेल्या संघर्षाची ही प्रेरणा देणारी स्टोरी असून आजोबांच्या संघर्षाला अनेकांनी सलाम केला आहे.