मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ICG Recruitment : भारतीय तटरक्षक दलात भरती; सहाय्यक कमांडंट पदांसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार

ICG Recruitment : भारतीय तटरक्षक दलात भरती; सहाय्यक कमांडंट पदांसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार

Feb 19, 2024, 02:43 PM IST

  • Indian Coast Guard Recruitment news : भारतीय तटरक्षक दलामध्ये सहाय्यक कमांडंट पदांच्या ७० जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे.

Job Opportunity in Indian Coast Guard

Indian Coast Guard Recruitment news : भारतीय तटरक्षक दलामध्ये सहाय्यक कमांडंट पदांच्या ७० जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे.

  • Indian Coast Guard Recruitment news : भारतीय तटरक्षक दलामध्ये सहाय्यक कमांडंट पदांच्या ७० जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) सहाय्यक कमांडंट पदांच्या ७० जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. भरती प्रक्रिया आज, १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार joinindiancoastguard.cdac.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

Hyderabad Rain : तप्त उन्हाळ्यात अचानक बरसला मुसळधार पाऊस, भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

इंडियन कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंट भरती: रिक्त पदांचा तपशील

जनरल ड्युटी (GD): ५० जागा

टेक्निकल (Engg/ Elect): २० जागा

पात्रतेचे निकष:

जनरल ड्युटी (GD) या पदांसाठी उमेदवार किमान ६० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पास झालेला असावा.

टेक्निकल (मेकॅनिकल) या श्रेणीतील पदांसाठी उमेदवाराने नेव्हल आर्किटेक्चर (Naval Architecture) किंवा मेकॅनिकल (Mechanical) किंवा मरीन (Marine) किंवा ऑटोमोटिव्ह (Automotive) किंवा मेकॅट्रॉनिक्स (Mechatronics) किंवा इंडस्ट्रियल अँड प्रॉडक्शन (Industrial and Production) किंवा मेटलर्जी (Metallurgy) किंवा डिझाइन (Design) किंवा एरोनॉटिकल (Aeronautical) किंवा एरोस्पेसमध्ये (Aerospace)  या विषयांमधून किमान ६० टक्के एकूण गुणांसह अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.

टेक्निकल (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) साठी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनीअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये किमान ६० टक्के गुणांसह इंजिनीअरिंग पदवी आवश्यक आहे.

उमेदवाराचे वय १ जुलै २०२४ रोजी २१-२५ वर्षे दरम्यान असावे.

भारतीय तटरक्षक दल सहाय्यक कमांडंट भरती:

अर्ज शुल्क

सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क  ३०० रुपये आहे. जे नेट बँकिंग किंवा व्हिसा / मास्टर / मेस्ट्रो / रुपे / क्रेडिट / डेबिट कार्ड / यूपीआय वापरुन ऑनलाइन भरता येईल.

एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.