मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JNU कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार; कॉफी हाउसच्या मागे बोलावले आणि…

JNU कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार; कॉफी हाउसच्या मागे बोलावले आणि…

May 21, 2022, 12:59 PM IST

    • जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

    • जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

डाव्या व उजव्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांमधील संघर्षामुळं सातत्यानं चर्चेत असलेलं दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Rape inside JNU Campus) आता वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आलं आहे. विद्यापीठातील कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी वसंत कुंज पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव हिमांशू रंजन (वय ३१) असून तो मूळचा झारखंडचा आहे. हा तरुण सीए असून जेएनयूमध्ये भाषेचा कोर्स करत आहे. दिल्लीतील मुनिरका इथं तो भाड्यानं राहतो. पीडित विद्यार्थिनी जेएनयूमध्ये एमसीएच्या अभ्यासक्रमाला असून ती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहते. तिच्या तक्रारीनंतर हिमांशू रंजनला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका कंपनीत इंटर्नशीप करते. तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसला कार्यालयाचा फोटो ठेवला होता. त्यातून आरोपीशी तिची ओळख झाली. मी सुद्धा जेएनयूचा विद्यार्थी असल्याचं आरोपीनं तिला सांगितलं व इंटर्नशीप मिळवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. आरोपीनं पीडितेचा मोबाइल नंबर मिळवला व त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला. पुरेशी ओळख झाल्यानंतर १४ मे रोजी आरोपी हिमांशूनं पीडितेला इंडिया कॉफी हाउसजवळ भेटण्यासाठी बोलावलं. सुरुवातीला त्यानं अभ्यास व नोकरीची चर्चा केली व नंतर मैत्रीचा प्रस्ताव पीडितेपुढं ठेवला. पीडितेनं त्यास नकार दिला. त्यानंतर हिमांशू तिला कॉफी हाउसच्या मागे अंधारात घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. तिचा मोबाइलही आरोपीनं हिसकावून घेतला. पीडित तरुणीनं नंतर मित्राच्या मदतीनं पोलिसांकडं तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.