मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ITBP bus acccident: काश्मीरमध्ये ITBPच्या ३९ जवानांच्या बसला भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

ITBP bus acccident: काश्मीरमध्ये ITBPच्या ३९ जवानांच्या बसला भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

Aug 16, 2022, 12:38 PM IST

    • ITBP bus acccident: अमरनाथ यात्रेसाठी तैनात केलेले जवान परत येत असताना हा अपघात झाला. बसमधून ३९ जण प्रवास करत होते अशी माहिती आयटीबीपीने दिली आहे.
आयटीबीपी जवानांच्या बसला भीषण अपघात

ITBP bus acccident: अमरनाथ यात्रेसाठी तैनात केलेले जवान परत येत असताना हा अपघात झाला. बसमधून ३९ जण प्रवास करत होते अशी माहिती आयटीबीपीने दिली आहे.

    • ITBP bus acccident: अमरनाथ यात्रेसाठी तैनात केलेले जवान परत येत असताना हा अपघात झाला. बसमधून ३९ जण प्रवास करत होते अशी माहिती आयटीबीपीने दिली आहे.

ITBP bus acccident: काश्मीरमध्ये आयटीबीपीच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस उलटल्याने अनेक जवान जखमी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अमरनाथ यात्रेसाठी तैनात केलेले जवान परत येते असताना हा अपघात झाला. आयटीबीपीने दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये ३९ जवान होते. ब्रेक फेल झाल्याने बस रस्त्यावरून नदी किनारी कोसळून दुर्घटना घडली आहे. बस चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होती.

ट्रेंडिंग न्यूज

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये ३९ जवान होते, यात आयटीबीपीचे ३७ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे दोन जवान होते. बसचा ब्रेक निकामी झाल्यानं ही दुर्घटना घडली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पहलगाम इथं अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू झालं आहे. अपघातातील जखमींना श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात येत आहे. सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एक मिनी बस रस्त्यावरून दरीत पडली होती. यात १८ जण जखमी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश होता. मिनी बस बरमीनहून उधमपूरकडे जात होती. तेव्हा वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला होता.