मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  INS Vikrant: भारतीय नौदलाची ताकद वाढली; अखेर ‘आयएनएस विक्रांत’ ताफ्यात

INS Vikrant: भारतीय नौदलाची ताकद वाढली; अखेर ‘आयएनएस विक्रांत’ ताफ्यात

Jul 29, 2022, 09:24 AMIST

INS Vikrant १९७१ च्या युद्धात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. स्वदेशी बननावटीचे हे विमानवाहू जहाज आज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी अधिकृतरित्या हे जहाज देशसेवेसाठी सज्ज होणार आहे. देशातच तयार करण्यात आलेल्या या जहाजामूळे अशी जहाज बांधणीची क्षमता असणाऱ्या काही देशांच्या यादीत भारत जाऊन पोहचला आहे.

  • INS Vikrant १९७१ च्या युद्धात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. स्वदेशी बननावटीचे हे विमानवाहू जहाज आज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी अधिकृतरित्या हे जहाज देशसेवेसाठी सज्ज होणार आहे. देशातच तयार करण्यात आलेल्या या जहाजामूळे अशी जहाज बांधणीची क्षमता असणाऱ्या काही देशांच्या यादीत भारत जाऊन पोहचला आहे.
आयएनएस विक्रांत’ स्वबळावर देशात बांधण्यात आलेली देशातील पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. २००३ ला विक्रांतच्या बांधणीला मान्यता देण्यात आली, आराखडा अंतिम होत फेब्रुवारी २००९ ला ‘कोची शिपयार्ड लिमिटेड’मध्ये बांधणीला सुरुवात झाली.
(1 / 9)

ऑगस्ट २०१३ मध्ये युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले, विविध उपकरणे युद्धनौकेवर बसवण्यात आली. या जहाजाच्या अनेक समुद्री चाचण्या घेन्यात आल्या. मात्र, करोना आणि टाळेबंदीमुळे विक्रांतच्या चाचण्यांना विलंब झाला होता.
(2 / 9)

जुलै २०२२ मध्ये विक्रांतच्या चाचणीचा चौथा आणि अंतिम टप्पा पार पडला, सर्व चाचण्या यशस्वी झाल्या. अखेर आज २८ जुलैला शिपयार्डने नौदलाकडे विक्रांत सुपूर्त केली,
(3 / 9)

विक्रांत युद्धनौकेवर आता अखेरचा हात फिरवला जात आधी जाहिर केल्याप्रमाणे १५ ऑगस्टला नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. आयएनएस विक्रांत’च्या उभारणीचा खर्च तब्बल २० हजार कोटींपेक्षा जास्त आला आहे. या जहाजाचे वजन ४५ हजार टन असून एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला पार क्षमता या जहाजाची आहे.
(4 / 9)

आयएनएस विक्रांत’तब्बल २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच आहे. विक्रांतवर ३५ पेक्षा जास्त मिग-२९ लढाऊ विमाने, विविध हेलिकॉप्टर तैनात असणार आहे.
(5 / 9)

भारतीय नौदलाने प्रतिष्ठित स्वदेशी विमानवाहू वाहक (AC) ‘विक्रांत’ ची डिलिव्हरी कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL), कोची यांच्याकडून घेऊन आज सागरी इतिहास रचला आहे. भारतीय नौदलाच्या इनहाऊस डायरेक्टरेट ऑफ नेव्हल डिझाईन (DND) द्वारे डिझाइन केलेले आणि CSL, जहाजबांधणी मंत्रालय (MoS) अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्डद्वारे बांधले गेले आहे.
(6 / 9)

भारतातील पहिले विमानवाहू जहाज असलेल्या विक्रांतने १९७१ च्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांतर या जहाजाल निवृत करण्यात आले होते. मात्र, देशापुढील आव्हाने बघता विमानवाहू जहाज गरजेचे होते. त्यामुळे देशातच या जहाजाची बांधणी करण्यात आली.
(7 / 9)

विक्रांत मध्ये चार गॅस टर्बाइन्स आहेत. यामुळे एकूण ८८ मेगावॅट पॉवर ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. विक्रांतचा वेग हा 28 नॉट्स आहे.
(8 / 9)

विक्रांत मशिनरी ऑपरेशन, जहाज नेव्हिगेशन आणि कुठल्याही हवामानात टिकून राहण्यासाठी उच्च प्रमाणात ऑटोमेशनसह तयार केले गेले आहे. हे जहाज एअर विंग चालविण्यास सक्षम असेल. जहाजावर MIG-29K लढाऊ विमाने, कामोव्ह-31, MH-60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर, स्वदेशी बनावटीची प्रगत हलकी हेलिकॉप्टर (ALH) आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) यांचा समावेश असलेली 30 विमाने असतील. ) (नौदल). STOBAR (शॉर्ट टेक-ऑफ बट अरेस्टेड लँडिंग) या नावाने ओळखल्या जाणार्‍या नवीन एअरक्राफ्ट-ऑपरेशन मोडचा वापर करून, IAC विमान सुरू करण्यासाठी स्की-जंप आणि जहाजावर त्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी 'अरेस्टर वायर्स'सह सुसज्ज आहे.
(9 / 9)

    शेअर करा