मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खाद्यतेल स्वस्त होणार? 'हा' देश भारताला पुरवणार एकूण गरजेच्या ६० टक्के तेल

खाद्यतेल स्वस्त होणार? 'हा' देश भारताला पुरवणार एकूण गरजेच्या ६० टक्के तेल

May 20, 2022, 11:45 AM IST

    • भारतात जगातल्या सर्वात जास्त तेलाची आयात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेन युद्धानं भारतात तेलाचे भाव भडकल्याचं चित्र होतं. आता मात्र शेजारी देशाने भारताला तेल देण्याचं ठरवलं आहे. त्यानं तेलाच्या किंतीत काही प्रमाणात खाली येतील अशी अपेक्षा आहे.
खाद्यतेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता (हिंदुस्तान टाइम्स)

भारतात जगातल्या सर्वात जास्त तेलाची आयात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेन युद्धानं भारतात तेलाचे भाव भडकल्याचं चित्र होतं. आता मात्र शेजारी देशाने भारताला तेल देण्याचं ठरवलं आहे. त्यानं तेलाच्या किंतीत काही प्रमाणात खाली येतील अशी अपेक्षा आहे.

    • भारतात जगातल्या सर्वात जास्त तेलाची आयात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेन युद्धानं भारतात तेलाचे भाव भडकल्याचं चित्र होतं. आता मात्र शेजारी देशाने भारताला तेल देण्याचं ठरवलं आहे. त्यानं तेलाच्या किंतीत काही प्रमाणात खाली येतील अशी अपेक्षा आहे.

जगात सर्वात जास्त चमचमीत आणि तिखट खाल्लं जाणारा देश किंवा फोडणीचे पदार्थ सर्वात जास्त खाणारा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. आपल्या देशाची खाद्य संस्कृतीच मुळात तेलाशी जोडली गेली असल्यानं तेलाशिवाय तसे फारच कमी खाद्यपदार्थ आपल्या देशात बनवले जातात.

ट्रेंडिंग न्यूज

Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

मात्र गेले काही महिने रशिया आणि युक्रेन युद्धाचा थेट फटका भारताला बसला होता. याचं कारण म्हणजे भारतात सूर्यफुलाचं सर्वात जास्त म्हणजेच ८० टक्के तेल युक्रेनहुन येतं. मात्र युक्रेन युद्धानं भारताच्या तेलाच्या साठ्यावर परिणाम झाला आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या स्वयंपाकघरावर झाला.

गेल्या काही महिन्यात तेलाचे आकाशाला भिडलेले भाव सर्वाच्या चेहऱ्यावर चिंतेची सावली घेऊन आले होते. आता मात्र यातनं काहीसा दिलासा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.भारताचा शेजारी देशारी देश इंडोनेशियाने भारताची ही कसर भरून काढण्याचं ठरवलं आहे. इंडोनेशियाने भारताला पामतेल निर्यातीला होकार दिलाय. त्यामुळे खाद्यतेल व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

भारतातल्या एकूण मागणीच्या ६० टक्के पामतेल इंडोनेशियातनं भारतात पाठवलं जातं. त्यापाठोपाठ सोयाबीन तेल आणि सूर्यफुलाचं तेलही इंडोनेशिया भारताला पाठवतं. हॉटेलांमध्ये मुख्यत्वे पामतेलाचा वापर केला जातो.

अखिल भारतीय तेल असोसिएशननुसार भारतात एकूण मागणीच्या ८० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. इंडोनेशिया सरकारला तिथल्या निर्यातदारांच्या दबावाखाली झुकावं लागलं आहे. त्याच वेळेस भारतीय आयातदारांनी तिथे केलेल्या मुत्सद्देगिरीचा फायदा झाला आहे.आता इंडोनेशियातून २३ मे पासून खाद्यतेल आयातीला सुरुवात होणार असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितलं.

एक नजर टाकूया भारतातील खाद्यातेलांच्या मार्च आणि मे महिन्यातल्या तेलांच्या प्रति लिटर किमतींवर

प्रकारमार्चमधील भावसद्यस्थिती
पामतेल१२५ ते १३५१४० ते १४५
सोयाबीन१४५ ते १५०१६० ते १७५
सूर्यफूल१५५ ते १६०१८५ ते १९५
शेंगदाणा१७५ ते १९५ १९५ ते २२५
राईसब्रान१४० ते १४५१६० ते १७०

युद्धामळे रशियाने १५ ते २० दिवसातनं एकदा एक जहाज मुंबईला रवाना केलं आहे. त्यामुळे खाद्यतेल भडकणं सहाजिक होतं. आता मात्र भारतीयांना इंडोनेशिया सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे. आतातरी देशात तेलाच्या भावाच्या किंमतींमध्ये घट झालेली पाहायला मिळू शकते.