मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran khan : इम्रान खान यांच्या घरात ३०-४० दहशतवादी लपल्याचा दावा, पोलिसांचा जमान पार्कला घेराव

Imran khan : इम्रान खान यांच्या घरात ३०-४० दहशतवादी लपल्याचा दावा, पोलिसांचा जमान पार्कला घेराव

May 17, 2023, 06:17 PM IST

  • Imran khan zaman park : पाकिस्तानमधील पंजाब सरकारने इम्रान यांच्याविषयी एक खळबळजनक दावा केला आहे. पंजाब सरकारचे म्हणणे आहे की, इम्रान यांच्या निवासस्थानी जमान पार्कमध्ये ३० ते ४० दहशतवादी लपले आहेत.

Imran khan

Imran khan zaman park : पाकिस्तानमधीलपंजाब सरकारने इम्रान यांच्याविषयी एक खळबळजनक दावा केला आहे. पंजाबसरकारचे म्हणणे आहे की, इम्रान यांच्या निवासस्थानीजमान पार्कमध्ये ३० ते ४० दहशतवादी लपले आहेत.

  • Imran khan zaman park : पाकिस्तानमधील पंजाब सरकारने इम्रान यांच्याविषयी एक खळबळजनक दावा केला आहे. पंजाब सरकारचे म्हणणे आहे की, इम्रान यांच्या निवासस्थानी जमान पार्कमध्ये ३० ते ४० दहशतवादी लपले आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मागे शहबाज शरीफ सरकार हात धुवून लागली आहे. इम्रान खान पाकिस्तानमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार इम्रान यांना पुन्हा अटक करून त्यांना तुरुंगात पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. आता पाकिस्तानमधील पंजाब सरकारने इम्रान यांच्याविषयी एक खळबळजनक दावा केला आहे. पंजाब सरकारचे म्हणणे आहे की, इम्रान यांच्या निवासस्थानी जमान पार्कमध्ये ३० ते ४० दहशतवादी लपले आहेत. २४ तासांना दहशतवादांना सरकारकडे सोपवण्याची मुदत दिली आहे. इम्रान यांच्या घराला चारी बाजुंनी पोलिसांनी घेरले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

शरीफ सरकारचे मंत्री अमिर मीर यांनी लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पीटीआयने या दहशतवाद्यांना पोलिसांच्या हवाली करावं. अन्यथा कायदा आपलं काम करण्यास सक्षम आहे. जमान पार्कमध्ये दहशतवादी लपल्याची आपल्याला कल्पना होती. त्यांसंदर्भातल गुप्त रिपोर्ट आपल्याला मिळाले होते, असं मीर म्हणाले. जो रिपोर्ट आम्हाला मिळालाय तो अतिशय धोकादायक आहे. एजन्सी जियो फेन्सिंगद्वारे जमान पार्कात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत पुष्टी करण्यात सक्षम आहेत. पीटीआय प्रमुख वर्षभरापासून लष्कराला निशाणा बनवत असल्याचंही मीर म्हणाले.

 

दोन दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी अटकेत असताना उसळलेल्या हिंसाचाराचे निमित्त करून एक कट शिजविण्यात आला. माझी पत्नी बुशरा बेगम हिला तुरुंगात टाकण्याचा तसेच देशद्रोहाच्या आरोपाखाली मला पुढील दहा वर्षे कारावासाची शिक्षा देण्याचे लष्कराने ठरविले आहे.

विभाग