मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  FD वरील व्याजदर वाढवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, ग्राहकांना मोठा फायदा

FD वरील व्याजदर वाढवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, ग्राहकांना मोठा फायदा

Aug 19, 2022, 03:01 PM IST

    • ICICI FD Interest Rates: बँकांनी हा बदल गेल्या महिन्यात आरबीआयने पतधोरण बैठकीनंतर रेपो रेट वाढवल्यानंतर केला आहे.
Money

ICICI FD Interest Rates: बँकांनी हा बदल गेल्या महिन्यात आरबीआयने पतधोरण बैठकीनंतर रेपो रेट वाढवल्यानंतर केला आहे.

    • ICICI FD Interest Rates: बँकांनी हा बदल गेल्या महिन्यात आरबीआयने पतधोरण बैठकीनंतर रेपो रेट वाढवल्यानंतर केला आहे.

ICICI FD Interest Rates: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गेल्या महिन्याच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात ५० बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली. त्यानंतर अनेक बँकांनी ठेवींवर व्याजदरात वाध केली. यामध्ये आयसीसीनेसुद्धा आता ठेवींवर व्याजाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ICICI बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या काही विशिष्ट मुदतीसाठी कऱण्यात आलेल्या ठेवींवर व्याजदरात ४० बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. आयसीआयसीआय ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी एफडीवर २.७५ टक्के ते ६.१० टक्क्यांपर्यंत व्याज देणार आहे. नवे व्याजदर १९ ऑगस्टपासून लागू होतील.

ट्रेंडिंग न्यूज

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

आयसीआयसीआय बँकेने म्हटलं की, १ ते २ वर्षांच्या मुदतीच्या ठेवीवर व्याजदरात १५ बेसिस पॉइंट वाढ केली असून यामुळे ५.३५ ट्कक्यांऐवजी ५.५० टक्के व्याज मिळेल. तर २ ते ३ वर्षांच्या मुदत ठेवींवर ५.५० मध्ये १५ बेसिस पॉइंटची वाढ होऊन ५.६५ टक्के दराने व्याज मिळेल. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ३ वर्षांपासून ते ५ वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक ४० बेसिस पॉइंट व्याज दर वाढवला आहे. त्यामुळे आता ५.७० टक्क्यांऐवजी ६.१० टक्के व्याज दिले जाणार आहे. व्यादजरात या बदलानंतर बँक आता ५ ते दहा वर्षांपर्यंत केलेल्या मुदत ठेवीसाठी ५.७५ टक्क्यांऐवजी ५.९० टक्के व्याज देईल.

याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक या बँकांनी त्यांच्या मुदतठेवींवर व्याज वाढवलं आहे. मुदत ठेवी केल्यास एका ठराविक मुदतीसाठी निश्चित व्याज दरासह रिटर्न मिळते.

विभाग