मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, इस्लामाबाद हायकोर्टाबाहेरून घेतले ताब्यात

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, इस्लामाबाद हायकोर्टाबाहेरून घेतले ताब्यात

May 09, 2023, 03:24 PM IST

  • Imran Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरच पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले.

Imran Khan

Imran Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरच पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले.

  • Imran Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरच पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले.

पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून आज माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरच पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले. इम्रान खान आज जामीन मिळवण्यासाठी हायकोर्टात गेले होते. इम्रान खान गेल्या अनेक दिवसांपासून लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात विधाने करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जायेत खिल्ली, VIDEO

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

इम्रान खान यांचे वकील फैसल चौधरी यांनी त्यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते मसर्रत चौधरी यांनी म्हटले की, माझ्या समोरच इम्रान खान यांना टॉर्चर केले गेले, मला भीती वाटते की, त्यांना ठार मारले जाऊ शकते.

माजी पंतप्रधानइम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनीही एक निवेदन जारी केले आहे. इस्लामाबादचे महानिरीक्षक (IG) यांनी सांगितले की, इम्रान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थितीनियंत्रणात आहे. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

 

त्याचवेळी, पीटीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये, उच्च न्यायालयाबाहेर अटकेदरम्यान झालेल्या हाणामारीत इम्रानचे वकील गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

 

विभाग