मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दिल्लीत तीन मजली इमारतीत भीषण अग्नितांडव, २६ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीत तीन मजली इमारतीत भीषण अग्नितांडव, २६ जणांचा होरपळून मृत्यू

May 14, 2022, 12:00 AM IST

    • दिल्लीच्या मुंडका (Mundka) परिसरात एका व्यापारी इमारतीला आज भीषण आग लागली. या आगीत होरपळून २६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीतून २६ मृतदेह बचाव पथकाच्या जवानांनी ताब्यात घेतले आहेत. मृतांचा आकडा वाढत आहे.
दिल्लीत तीन मजली इमारतीला आग

दिल्लीच्या मुंडका (Mundka) परिसरात एका व्यापारी इमारतीला आज भीषण आग लागली. या आगीत होरपळून २६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीतून २६ मृतदेह बचाव पथकाच्या जवानांनी ताब्यात घेतले आहेत. मृतांचा आकडा वाढत आहे.

    • दिल्लीच्या मुंडका (Mundka) परिसरात एका व्यापारी इमारतीला आज भीषण आग लागली. या आगीत होरपळून २६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीतून २६ मृतदेह बचाव पथकाच्या जवानांनी ताब्यात घेतले आहेत. मृतांचा आकडा वाढत आहे.

नवी दिल्ली -राजधानी दिल्लीतएका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिल्लीच्या मुंडका (Mundka) परिसरात एका व्यापारी इमारतीला आज भीषण आग लागली. या आगीत होरपळून २६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीतून २६ मृतदेह बचाव पथकाच्या जवानांनी ताब्यात घेतले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

पंतप्रधान मोदींनी घोषणा केली आहे की, पंतप्रधान सहाय्यता निधीतून या आगीतील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत केली जाईल, तसेच जखमींना ५० हजारांचे आर्थिक सहाय्य केले जाईल.

दिल्लीच्या मुंडका इमारतीत शुक्रवारी लागलेल्या आगीत २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह बाहेर काढले आहे. इमारतीमधून ५० ते ६० लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आग लागल्यानंतर लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या त्यात काहीजन जखमी झाले. चीफ फायर ऑफिसर अतुल गर्ग यांनी सांगितले की, बिल्डिंगमध्ये अजूनही ३० ते ४० जण अडकले असण्याची शक्यात आहे. बचाव कार्य सुरूच आहे. बचाव कार्यासाठी १०० जवानांचे पथक कार्यरत आहे. अग्निशामक दलाचे पथक इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर शोध घेत आहे. अग्निशमनच्या २७ गाड्यांनी आग आटोक्यात आणली.आग लागली तेव्हा विविध कार्यालयांमध्ये जवळपास १५० लोक काम करत होते. अशी माहिती मिळत आहे.

या आगीत मृत्यू झालेल्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधित इमारतीत आणखी काही नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी बचाव पथकाची टीम दाखल झाली असून युद्धपातळीवर अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.संबंधित घटना ही मुंडका मेट्रो स्टेशन (Mundka Metro Station)जवळच घडली आहे.

आगीची घटना ही आज संध्याकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर लगेच बचाव कार्य सुरु झालं. पोलिसांनी इमारतीच्या खिडक्या फोडून आतमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं आणि जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सबंधित तीन मजली इमारत ही कमर्शिअल इमारत आहे. तिथे वेगेवगळ्या खाजगी कंपन्यांचे कार्यालये आहेत. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर सर्वात आधी आग लागली. त्यानंतर ही आग वरच्या मजल्यांवर धुमसत गेली. ही आग नेमकी का लागली?याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अद्यापही सुरुच आहे. घटनास्थळी अग्निशन दलाच्या १० पेक्षा जास्त गाड्या आहेत. तसेच रुग्णवाहिका देखील आहे. बचावपथकाचं प्रचंड वेगाने काम सुरु आहे.