मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kuno National Park : आफ्रिकेतून आणलेल्या मादी चीता साशाचा मृत्यू, किडनीच्या आजाराने होती ग्रस्त

Kuno National Park : आफ्रिकेतून आणलेल्या मादी चीता साशाचा मृत्यू, किडनीच्या आजाराने होती ग्रस्त

Mar 27, 2023, 07:38 PM IST

  • Female cheetah died : श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सांगितले जात आहे की, मृत्यू झालेल्या मादी चित्त्याचे नाव साशा होते व तिला किडनीचा विकार होता.

संग्रहित छायाचित्र

Female cheetah died : श्योपूरजिल्ह्यातील कुनोनॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सांगितले जात आहे की, मृत्यू झालेल्या मादी चित्त्याचे नावसाशाहोते व तिला किडनीचा विकार होता.

  • Female cheetah died : श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सांगितले जात आहे की, मृत्यू झालेल्या मादी चित्त्याचे नाव साशा होते व तिला किडनीचा विकार होता.

Kuno National Park : मध्य प्रदेश राज्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ताचा मृत्यू झाला आहे. श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सांगितले जात आहे की, मृत्यू झालेल्या मादी चित्त्याचे नाव साशा होते व तिला किडनीचा विकार होता. यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. भारत नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी'प्रोजेक्ट चीता'सुरू करण्यात आला होता. मात्र चित्त्याच्या मृत्यूमुळे या प्रोजेक्टला धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

मादा चित्ता साशा गेल्या अनेक आठवड्यापासून किडनीच्या आजाराने पीडित होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे. साशाच्या गंभीर आजाराची माहिती झाल्यानंतर मध्य प्रदेश वन विभागाच्या पथकाने एक आपत्कालीन मेडिकल रेस्पॉन्स टीम श्योपुर येथील कुनोमध्ये पाठवली होती. साशाची प्रकृती जानेवारी महिन्यात खराब झाली होती. प्राथमिक तपासणीत साशाला डायरिया झाल्याचे समोर आले होते.

 

त्याचबरोबर सुत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले होते की, साशाला किडनीचा गंभीर आजार आहे. साशाचे आयुष्य वाचवण्यासाठी पशू चिकित्सक डॉक्टर अतुल गुप्ता यांच्या नेतृत्वात भोपाळमधून एक टीम कुनो पार्कमध्ये पाठवण्यात आली होती. भोपाळपासून कुनो नॅशनल पार्क जवळपास ३५० किलोमीटर दूर आहे. त्यावेळी साशालाFluidsदिले होते आणि तिच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र आता मादा चित्ता साशा हिच्या मृत्यूचे वृत्त आले आहे.

विभाग