मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर, ‘या’ कारणासाठी उद्धव ठाकरे अन् शरद पवारांची घेणार भेट

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर, ‘या’ कारणासाठी उद्धव ठाकरे अन् शरद पवारांची घेणार भेट

May 21, 2023, 08:36 PM IST

  • Kejriwal on Mumbai visit : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४ व २५ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

Delhi cm Kejriwal

Kejriwal on Mumbai visit : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल२४ व २५ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येत असूनउद्धव ठाकरेव राष्ट्रवादीचे प्रमुखशरद पवारयांची भेट घेणार आहेत.

  • Kejriwal on Mumbai visit : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४ व २५ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

दिल्लीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातकेंद्र सरकारच्या अध्यादेशवरून दिल्ली सरकार व मोदी सरकार आमने- सामने आली आहेत. केंद्र सरकारच्या या अध्यादेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री विरोधी पक्षांच्या नेत्यांचे समर्थन मागत आहेत. यामुळे केजरीवाल मुंबई दौऱ्यावर येत आहेत. केजरीवाल २४ व २५ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा या अध्यादेशाविरुद्ध समर्थन मागणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत येणार आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण तसेच भाजपने इतर पक्षांची केलेली कोंडी यावर चर्चा करण्यासाठी अरविंद केजरीवाल बुधवार २४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना २५ मे रोजी भेटणार आहेत. लोकशाही संपवायला निघालेल्या भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

 

आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी एकजुटीसाठी तयारी केली जात आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनीआज (रविवार) राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी सीएम केजरीवाल यांनी दिल्ली सर्विसेजबाबत केंद्र सरकार द्वारे लागू केलेल्या अध्यादेशाविरोधात नितीशकुमार यांचे समर्थन मागितले.