मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर धाय मोकलून रडली मुले, गावावरही पसरली नैराश्येची कळा, पाहा VIDEO

मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर धाय मोकलून रडली मुले, गावावरही पसरली नैराश्येची कळा, पाहा VIDEO

Jan 24, 2023, 12:46 PM IST

  • Children wepton transfer of headmaster : राजस्थानमध्ये एका मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या निरोप समारंभात शाळेतील विद्यार्थी व गावकरीही रडताना दिसले.

मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

Children wepton transfer of headmaster : राजस्थानमध्ये एका मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या निरोप समारंभात शाळेतील विद्यार्थी व गावकरीही रडताना दिसले.

  • Children wepton transfer of headmaster : राजस्थानमध्ये एका मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या निरोप समारंभात शाळेतील विद्यार्थी व गावकरीही रडताना दिसले.

राजस्थानच्या अलवरमधील मुंडावर क्षेत्रातील कृष्ण नगरात एका हेडमास्टरची बदली झाल्याने संपूर्ण गावावर नैराश्य पसरले आहे. गावातील लोकांनी मुख्याध्यापकांच्या सम्मानात निरोप समारंभाचे आयोजन केले होते. गावातील लोकांनी मुख्याध्यापकांना घोड्यावर बसवून डीजेच्या तालावर मोठ्या जल्लोषात गावातून मिरवणूक काढली व त्यांना शानदार निरोप दिला. दरम्यान गावातील लोक व मुले धाय मोकलून रडताना दिसून आली तर हेडमास्टर दिनेश कुमार यादव त्यांना समजावत होते की, काळजी करू नका मी पुन्हा येईन. या निरोप समारंभाचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हेडमास्टरच्या कर्तव्यनिष्ठेचे खूप कौतुक होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

मिळालेल्या माहितीनुसार हेडमास्टर दिनेश कुमार यादव यांची २८ डिसेंबर रोजी अलवरमधील खोर बसई स्कूलमध्ये बदली झाली होती. ते २१ जानेवारी रोजी कृष्ण नगर शाळेतून सेवामुक्त झाले. याची माहिती गावकऱ्यांना समजताच ते नाराज झाले. त्यानंतर गामस्थांनी मुख्याध्यापकांच्या सम्मानात निरोप समारंभाचे आयोजन करण्याचा निर्णय़ घेतला. यावेळी गावातील सर्व लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. विद्यार्थी रडून-रडून बेहाल झाले होते. मुले मुख्याध्यापकांना मिठ्ठी मारून त्यांनी जाऊ नये असा आग्रह करत होते.

मुलांना रडताना पाहून गावकरीही रडू लागले. दरम्यान विद्यालयातील दुसरे शिक्षक मुले व गावकऱ्यांना समजावताना दिसून आले. दिनेश कुमार यादव अलवर जिल्ह्यातील बहरोडमधील जखराना गावातील रहिवाशी आहे. दिनेश कुमार यादव१५वर्षापासून सरकारी सेवेतआहेत. गेल्या तीन वर्षापासून ते मुंडावरमधील या शाळेत शिकवत होते. राजसमंदहून त्यांची बदली ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंडावरमधील श्रीकृष्ण नगरच्या सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये झाली होती. आपल्या तीन वर्षाच्या सेवेत त्यांनी मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तसेच आपल्या कर्तव्याप्रति पूर्णपणे समर्पित राहिले.