मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  या वर्षी न्यू जर्सी… बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन ११ ऑगस्टपासून रंगणार

या वर्षी न्यू जर्सी… बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन ११ ऑगस्टपासून रंगणार

Aug 05, 2022, 06:58 PM IST

    • BMM Convention: जगभरातील मराठी माणसांना एकत्र आणणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन ११ ऑगस्टपासून न्यू जर्सी इथं रंगणार आहे.
BMM Convention

BMM Convention: जगभरातील मराठी माणसांना एकत्र आणणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन ११ ऑगस्टपासून न्यू जर्सी इथं रंगणार आहे.

    • BMM Convention: जगभरातील मराठी माणसांना एकत्र आणणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन ११ ऑगस्टपासून न्यू जर्सी इथं रंगणार आहे.

BMM Convention in New Jersey: जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेनं वाट पाहतात, ते मराठी मनाला जोडणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन अमेरिकेतील न्यू जर्सी इथं ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. करोनाच्या संकटामुळं काहीशा लांबलेल्या या अधिवेशनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mohan Bhagwat : 'जोपर्यंत गरज आहे, आरक्षणाची मर्यादा वाढवावी...', आरक्षणाच्या वादावर मोहन भागवतांचं मोठं विधान

NHPC Recruitment 2024: परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; एनएचपीसीमध्ये 'या'पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज!

Viral news : अन् जंगली हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळू लागला…

एक-दोन गुण कमी मिळाले असते तर बरे झाले असते, चेहऱ्यावर उगवलेल्या केसांमुळे ट्रोलिगमुळे टॉपर मुलगी नाराज

मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांनी ही माहिती दिली. दर दोन वर्षांनी होणारं हे अधिवेशन करोनामुळे गेल्या वर्षी होऊ शकले नव्हतं. हे अधिवेशन मोठ्या जल्लोषात साजरं करण्यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ सज्ज झालं आहे. चार दिवसीय अधिवेशनात मराठी मनाला साद घालणारे एकापेक्षा एक असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात प्रसिद्ध नाटकापासून चर्चासत्रे, पाककृती, नृत्य, नाट्य आणि संगीताशी संबंधित स्पर्धांचा समावेश असेल. एवढेच नव्हे तर या अधिवेशनात आपल्या आवडत्या कलाकारांनाही भेटता येणार आहे. त्याचप्रमाणे मराठी नाट्य आणि संगीतक्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती या अधिवेशनाचं खास आकर्षण असेल.

अधिवेशनात 'आमने सामने' या लोकप्रिय मराठी नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्याचप्रमाणे सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे या आपल्या आवडत्या कलाकारांचे कार्यक्रम बघण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. ‘सारखे काहीतरी होतेय’ हे नाटकही रसिकांना पाहता येणार आहे. त्यासाठी प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर ही जोडी तब्बल ४० वर्षांनी एकत्र येत आहे. अधिवेशनाचा समारोप शंकर महादेवन यांच्या सांगीतिक कार्यक्रमानं होईल. उत्तर अमेरिकेच्या २५ शहरातील स्थानिक कलाकारही अधिवेशनात आपले कलाविष्कार सादर करणार आहेत.

विभाग