मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : गंगा नदीत ४० लोकांना घेऊन जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध सुरू

VIDEO : गंगा नदीत ४० लोकांना घेऊन जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध सुरू

May 22, 2023, 03:49 PM IST

  • Boat Overturned in ganga river : बलियामध्ये सोमवारी सकाळी एक मोठी नाव दुर्घटना घडली आहे. ४० लोकांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला असून २० जण बेपत्ता आहेत.

Boat Overturned in ganga river

Boat Overturned in ganga river : बलियामध्ये सोमवारी सकाळी एक मोठी नाव दुर्घटना घडली आहे. ४० लोकांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला असून २० जण बेपत्ता आहेत.

  • Boat Overturned in ganga river : बलियामध्ये सोमवारी सकाळी एक मोठी नाव दुर्घटना घडली आहे. ४० लोकांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला असून २० जण बेपत्ता आहेत.

Boat Overturned: उत्तरप्रदेश राज्यातील बलियाजवळील माल्देपूर गंगा घाटावर सोमवारी सकाळी जवळपास साडे आठ वाजता ४० लोकांना घेऊन जाणारी बोट उलटली. यामुळे नावेतून प्रवास करणारे लोक बुडू लागले. स्थानिक लोकांनी तात्काळ मदत करत बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढले. सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर एका महिलेला गंभीर अवस्थेत वाराणशीला हलवण्यात आले आहे. दोघांवर बलिया जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गडवार क्षेत्रातील सोनबरसा गावातील रहिवाशी नेपाल खरवंशी यांच्या नातवाचा मुंडन कार्यक्रम होता. यासाठी कुटूंबीय व नातेवाईक विधी पूर्ण करण्यासाठी नावेतून गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जात होते.

नाविकाने काही अन्य लोकांनाही या कुटूंबाबरोबरच नावेत बसवले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बोटीमध्ये जवळपास ४० लोक सवार होते. नाव सुरू झाल्यानंतर केवळ पाच मिनिटातच बुडू लागली. नावेत पाणी घूसू लागले व नाव हेलकावे खाऊ लागली. योगायोगाने जवळच पूल होता. काही लोकांनी पुलाच्या रस्सीने अनेक लोकांना सुरक्षित बाहेर काढले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. परिणामी ही बोट नदीच्या मध्यभागी उलटली. बोटीतले प्रवासी हे मुंडन समारंभात सहभागी झाले होते. बोट उलटल्यानंतर काही लोक पोहत बाहेर आले, तर घटनास्थळी उपस्थित लोकांनी लगेच नदीपात्रात उड्या मारून ज्यांना पोहता येत नव्हतं अशा काही लोकांना वाचवलं. लोकांनी ज्यांना नदीतून बाहेर काढलं त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर बोटीतले २० पेक्षा जास्त प्रवासी बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

विभाग