मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BJP Vs AAP: 'केजरीवालांचे पितळ उघडे', म्हणत भाजपने स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ केला शेअर

BJP Vs AAP: 'केजरीवालांचे पितळ उघडे', म्हणत भाजपने स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ केला शेअर

Sep 15, 2022, 01:20 PM IST

    • BJP Vs AAP: भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ दाखवत म्हटलं की, आम आदमी पार्टीच्या घोटाळ्याचा स्टिंग व्हिडीओ समोर आला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (फोटो - एएनआय़)

BJP Vs AAP: भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ दाखवत म्हटलं की, आम आदमी पार्टीच्या घोटाळ्याचा स्टिंग व्हिडीओ समोर आला आहे.

    • BJP Vs AAP: भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ दाखवत म्हटलं की, आम आदमी पार्टीच्या घोटाळ्याचा स्टिंग व्हिडीओ समोर आला आहे.

BJP Vs AAP: दिल्लीतील कथित दारु घोटाळा प्रकरणात आता केजरीवाल यांच्यावर भाजपने नवा आरोप केला आहे. भाजपने या प्रकरणातला एक स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपने दावा केलाय की, या व्हिडीओत दिसत असणारी व्यक्ती घोटाळ्यातील आरोपी नंबर ९ अमित अरोरा आहे. या व्हिडीओमुळे केजरीवाल सरकारची पोलखोल झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ दाखवत म्हटलं की, आम आदमी पार्टीच्या घोटाळ्याचा स्टिंग व्हिडीओ समोर आला आहे. यात दारु घोटाळा प्रकरणातील आरोपी नंबर ९ अमित अरोरा याने सगळा उलगडा केला आहे. कोणाकडून किती पैसे घेण्यात आले, कशा प्रकारे घोटाळा झाला या सगळ्याची माहिती समोर आली आहे. पूर्ण योजनाच घोटाळा करण्यासाठी तयार केली होती. अमित अरोरा सांगतो की, "यात टक्केवारी सरकारने ठरवली आहे. तसंच दारु घोटाळ्यातील पैसे गोवा आणि पंजाबच्या निवडणुकीत वापरण्यात आले."

अरोराने व्हिडीओत म्हटलं आहे की, ५-५ कोटी रुपयांपर्यंत किमान शुल्क निश्चित केलं. ५ कोटी यासाठी कारण लहान-मोठे प्लेअर्स येऊ नयेत. मात्र ही पॉलिसी याआधारावरच तयार केली होती की यामध्ये लहान लहान व्यापाऱ्यांना काम करण्याची संधी मिळेल. ही योजना इतर राज्यांमध्ये अशाच पद्धतीने आणली जाते आणि लहान व्यापाऱ्यांनासुद्धा संधी मिळते.

भाजपने याआधी ५ सप्टेंबरला एक स्टिंग व्हिडीओ जारी केला होता. तेव्हा दावा केला होता की, सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपी नंबर १३ सनी मारवाह याचे वडील कुलविंदर मारवाह यांनी गुप्त कॅमेऱ्यावर आप सरकारकडून कमीशन घेतलं गेल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, दिल्लीचे मंत्री मनिष सिसोदिया यांनी हे स्टिंग ऑपरेशन हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं. दिल्लीच्या दारु घोटाळ्याची चौकशी सध्या सीबीआय करत आहे आणि यात मनिष सिसोदिया हे मुख्य आरोपी आहेत. सीबीआयने काही दिवसांपूर्वी सिसोदिया यांच्या घराची आणि बँक लॉकरची तपासणी केली होती.