मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Army chopper crash: अरुणाचलमध्ये कोसळले लष्कराचे हेलिकॉप्टर, तीन आठवड्यातील दुसरा अपघात

Army chopper crash: अरुणाचलमध्ये कोसळले लष्कराचे हेलिकॉप्टर, तीन आठवड्यातील दुसरा अपघात

Oct 21, 2022, 12:53 PM IST

  • Army chopper crash in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातील सिंगिंग गावाजवळ लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळल्याचं वृत्त आहे.

Arunachal Pradesh Chopper Crash

Army chopper crash in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातील सिंगिंग गावाजवळ लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळल्याचं वृत्त आहे.

  • Army chopper crash in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातील सिंगिंग गावाजवळ लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळल्याचं वृत्त आहे.

Army chopper crash in Arunachal Pradesh: भारतीय संरक्षण दलाच्या विमानांच्या अपघातांची मालिका थांबण्याचं नावच घेत नाहीए. तवांग इथं हेलिकॉप्टर कोसळून एका जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कोणी जखमी झालं आहे का याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, लष्करानं युद्धपातळीवर मदत व बचावकार्य हाती घेतलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

लष्कराच्या जनसंपर्क विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचलच्या अप्पर सियांग जिल्ह्यातील टूटिंग मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावात ही दुर्घटना घडली आहे. अपघातस्थळी जाण्यासाठी रस्ता नसल्यानं मदतकार्यात अडचणी येत आहेत. घटनेची माहिती मिळताच लष्करानं बचाव पथक रवाना केलं आहे. अरुणाचलमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळण्याची मागील तीन आठवड्यांतील ही दुसरी घटना आहे.

१५ दिवसांपूर्वीच घडली होती अशी घटना

अरुणाचलमधील तवांगमध्ये देखील ५ ऑक्टोबर रोजी लष्कराचे ‘चित्ता’ हे हेलिकॉप्टर कोसळले होते. नियमित उड्डाणाच्या दरम्यान हा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या दोन वैमानिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गोव्यात नौदलाच्या विमानाला झाला होता अपघात

गोव्यात १२ ऑक्टोबरला भारतीय नौदलाचे मिग-२९ के हे लढाऊ विमान कोसळलं होतं. तांत्रिक बिघाडामुळं हा अपघात झाल्याची माहिती नौदलानं दिली होती. नौदलाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'गोव्याच्या समुद्रावरून नियमितपणे उड्डाण करणाऱ्या मिग 29K मध्ये परतीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाला. बिघाडानंतर वैमानिक तातडीनं बाहेर पडले होते. बचावकार्य वेळीच हाती घेतलं गेल्यामुळं त्यांचा जीव वाचला.