मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 09 February 2023 : मुंबईतील गिरगावमध्ये एलआयसीच्या इमारतीला भीषण आग
Live Blog (HT)

Live News Updates 09 February 2023 : मुंबईतील गिरगावमध्ये एलआयसीच्या इमारतीला भीषण आग

Feb 09, 2023, 11:15 PMIST

Girgaon LIC Building Fire : अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Feb 09, 2023, 11:13 PMIST

LIC Building Fire : मुंबईतील गिरगावमध्ये एलआयसीच्या इमारतीला भीषण आग

Girgaon LIC Building Fire : मुंबईतील गिरगाव येथील एलआयसीच्या इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग कशामुळं लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आगीमुळं जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 09, 2023, 04:36 PMIST

सेन्सेक्समध्ये १४२.४३ अंशांची तर निफ्टीत २१.७५ अंशांची वाढ 

साप्ताहिक एक्स्पायरीच्या दिवशी, शेअर बाजार एका श्रेणीत व्यवहार करताना दिसला आणि शेवटी सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही हिरव्या रंगात बंद झाले. आजच्या व्यवहारात मेटल, रियल्टी आणि ऑटो समभागात विक्री झाली तर इन्फ्रा, एनर्जी आणि एफएमसीजी समभागांवर दबाव दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स १४२.४३ अंशांनी म्हणजेच ०.२३ टक्क्यांनी वाढून ६०,८०६.२२ वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी २१.७५ अंशांच्या म्हणजेच ०.१२ टक्क्यांच्या वाढीसह १७,८९३.४५ च्या पातळीवर बंद झाला आहे.

गुरुवारच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला आणि भारती एअरटेल यांना निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी लाइफ, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स आणि इंडसइंड बँक हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

Feb 09, 2023, 01:56 PMIST

Uddhav Thackeray:  उद्धव ठाकरे मीरा रोडमधील जैन मंदिरात दाखल

अंजन शलाका महोत्सवासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईच्या मीरा रोडमधील जैन मंदिरात दाखल झाले आहेत.

Feb 09, 2023, 01:11 PMIST

BJP Protest: केरळ अर्थसंकल्पाविरोधात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

केरळमधील कोची येथे भाजप कार्यकर्त्यांनी केरळ राज्याच्या अर्थसंकल्पाविरोधात निदर्शने केली. त्यानंतर कार्यक्रर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा वापर केला.

Feb 09, 2023, 10:47 AMIST

Delhi HDFC Bank Fire: दिल्लीतील एचडीएफसी बँकेत आग

दिल्लीतील एचडीएफसी बँकला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनदलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत कोणताही जीवितहानी न झाल्याचे वृत्त आहे.

Feb 09, 2023, 09:50 AMIST

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार निरंजन डावखरे हेही यावेळी उपस्थित होते.

Feb 09, 2023, 09:42 AMIST

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज राज्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी व विविध शहरांमध्ये हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचा (५००) लोकार्पण होणार, सह्याद्री अतिथीगृहावर होणार मुख्य कार्यक्रम

Feb 09, 2023, 09:27 AMIST

सेन्सेक्स निफ्टी घसरले, अदानी टोटल गॅसचे तिमाही निकाल आज

जागतिक पातळीवरुन मिळालेल्या संमिश्र संकेतांना प्रतिसाद देत आज शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली आहे. आशियाई बाजारपेटेत सुरुवातीला निर्देशांकात घट दिसत आहे. तर अमेरिकन फ्यूचरमध्ये किंचित रिकव्हरी दिसत आहे. अमेरिकन इंडेक्स काल १.५ टक्का घसरणीसह बंद झाले. त्यामुळे सेन्सेक्समध्ये ६५.३ अंश म्हणजेच ०.११ टक्के घसऱणीसह ६०,५९८.४९ अंशपातळीवर खुला झाला. तर निफ्टीत ४५.४० अंश म्हणजेच ०.२५ टक्के घसरणीसह १७,८२६.३० अंश पातळीवर खुला झाला. आज अदानी टोटल गॅसचे तिमाही निकाल येणार आहेत.त्यामुळे या कंपनीच्या शेअर्ससह एअरटेल, बँक स्टाॅक्सवर अधिक लक्ष राहणार आहे.

Feb 09, 2023, 08:12 AMIST

Transgender Gives Birth:  केरळच्या ट्रान्सजेंडरने दिला बाळाला जन्म केरळच्या ट्रान्सजेंडरने दिला बाळाला जन्म

केरळच्या ट्रान्सजेंडरने दिला बाळाला जन्म दिला असून बाळाचे लिंग गुपित ठेवण्यात आले आहे. देशात पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरने बाळाला जन्म दिला आहे.

Feb 09, 2023, 07:39 AMIST

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपरी पुलाचे लोकार्पण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपरी पुलाचे लोकार्पण होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू होते. कोपरी पुलामुले ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

    शेअर करा