मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नराधमाचा मुलीवर बलात्कार; संतापजनक घटनेनं नागपुरात खळबळ

आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नराधमाचा मुलीवर बलात्कार; संतापजनक घटनेनं नागपुरात खळबळ

Jan 23, 2023, 04:47 PM IST

    • Nagpur Crime News Today : पीडितेच्या आईसोबत आरोपी अमोल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. महिला बाहेर गेल्याची संधी साधून आरोपीनं तरुणीवर बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
Nagpur Rape Case (HT_PRINT)

Nagpur Crime News Today : पीडितेच्या आईसोबत आरोपी अमोल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. महिला बाहेर गेल्याची संधी साधून आरोपीनं तरुणीवर बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

    • Nagpur Crime News Today : पीडितेच्या आईसोबत आरोपी अमोल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. महिला बाहेर गेल्याची संधी साधून आरोपीनं तरुणीवर बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

Nagpur Rape Case : तरुणीच्या आईसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आरोपी तरुणानं तिच्या मुलीवरच जबरदस्तीनं बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून आरोपी तरुण मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता. परंतु आता तरुणीनं याबाबतची माहिती तिच्या आईला दिल्यानंतर घटनेचा भांडाफोड झाला आहे. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत आरोपीला काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहे. काही दिवसांपूर्वीच नागपुरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात एक महिला अमोल घरडे या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. परंतु आरोपी अमोलने महिलेच्या मुलीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. महिलेशी प्रेमसंबंध असतानाही अमोलनं तिच्या मुलीशी अनैतिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून अमोल जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर सातत्यानं बलात्कार करत होता. प्रेयसी महिला गावी गेली असता आरोपी अमोलनं संधी साधून तिच्या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यासाठी तरुणीनं नकार दिल्यानंतर अमोलनं तिला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर पीडितेनं घडलेला सारा प्रकार आईच्या मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर पीडितेनं आरोपी अमोलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

याशिवाय आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती समजताच महिलेनं तात्काळ नागपूर गाठलं. त्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपी अमोलला अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात सातत्यानं गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंत नागपुरात खळबळ उडाली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा