मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात गोदामची भिंत फोडत तब्बल १२ लाख रुपयांची वाईन केली लंपास

Pune Crime : पुण्यात गोदामची भिंत फोडत तब्बल १२ लाख रुपयांची वाईन केली लंपास

Aug 10, 2022, 10:11 AM IST

    • पुण्यातील सासवड मार्गावर असलेल्या एका वाईन शॉपच्या गोदामाची भिंत फोडत चोरट्यांनी तब्बल १२ लाख रुपयांची दारू लंपास केली आहे.
पुणे क्राइम

पुण्यातील सासवड मार्गावर असलेल्या एका वाईन शॉपच्या गोदामाची भिंत फोडत चोरट्यांनी तब्बल १२ लाख रुपयांची दारू लंपास केली आहे.

    • पुण्यातील सासवड मार्गावर असलेल्या एका वाईन शॉपच्या गोदामाची भिंत फोडत चोरट्यांनी तब्बल १२ लाख रुपयांची दारू लंपास केली आहे.

पुणे : पुण्यात गोदामच्या भिंती फोडून चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातील सासवड रस्त्यावर घडली आहे. येथील वाईनच्या गोदामची भिंत फोडून तब्बल १२ लाख रुपयांच्या वाईनच्या बाटल्यांची खोकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. एवढेच नाही तर चोरी सापडू नये यासाठी गोदामात लावलेले सीसीटीव्ही आणि त्याचा डीव्हीआर चोरट्यांनी पळवला आहे. या परकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

या प्रकरणी वाईन एंटरप्रायजेस प्रा. लि. चे संतोष केशवे (वय ३३, रा. शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड रस्त्यावरील वडकी, ऊरळी देवाची, मंतरवाडी भागात गोदामे आहेत. गोदामांमध्ये विविध कंपन्यांच्या मालाची साठवणूक केली जाते. पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी पथकांची स्थापना केली असून ती चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहे.

सासवड रस्त्यावरील श्रीनाथ एंटरप्रायजेस गोदामात केशवे यांच्या कंपनीच्या वाईनची खोकी ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी गोदामाची भिंत मंगळवारी पहाटे फोडली. गोदामातील वेगवेगळ्या कंपनीच्या वाईनच्या बाटल्या खोक्यात ठेवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी वाईनच्या बाटल्यांची खोकी लांबविली. चोरट्यांनी १२ लाख ६५ हजारांचे बाटल्या लांबविल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा