मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mega Block: मध्य, पश्चिम आणि ट्रान्सहार्बर लाईनवर रविवारी मेगा ब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Mega Block: मध्य, पश्चिम आणि ट्रान्सहार्बर लाईनवर रविवारी मेगा ब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Feb 03, 2024, 10:53 PM IST

    • Central, Western, Transharbour Lines Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला.
Mumbai Local Mega Block (HT)

Central, Western, Transharbour Lines Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला.

    • Central, Western, Transharbour Lines Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला.

Mumbai Local Train Mega Block 04 April 2024: मुंबईत रविवारी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वे, ट्रान्सहार्बर लाईनवर रविवारी (०४ एप्रिल २०२३) मेगा ब्लॉक घोषित करण्यात आहे. तर, पश्चिम रेल्वेकडून पश्चिम मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर; लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक आलं समोर

Narendra Dabholkar Murder Case: आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर निर्दोष का सुटले?

Narendra Dabholkar case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा

Mumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

मध्य रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत लोकल सेवा बंद असेल. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येईल. तर या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबणार आहेत. तर पुढे विद्याविहार स्थानकापासून डाउन मार्गावर वळवण्यात येणार आहे. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.

Maharashtra Weather update: थंडी सोबत अवकाळी पाऊस लावणार हजेरी; राज्यात पुढील काही दिवस असे असेल हवामान

ट्रान्सहार्बर लाईन

ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान धावणाऱ्या लोकल सेवा सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत बंद असेल. हार्बर आणि उरण मार्गावर मेगाब्लॉक नसणार, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

Mumbai threat message : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब! वाहतूक पोलिसांना मेसेजवरुन धमकी; यंत्रणा सतर्क

पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर उद्या रविवारी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. तर, गोरेगाव आणि बोरिवली स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक असेल. रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करणे, हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा