मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदेंना मी काय नाही दिलं?; उद्धव ठाकरे यांचा थेट सवाल

एकनाथ शिंदेंना मी काय नाही दिलं?; उद्धव ठाकरे यांचा थेट सवाल

Jun 24, 2022, 03:31 PM IST

    • Uddhav Thackeray on Eknath Shinde: शिवसेनेतील बंडावर कालपर्यंत संयमानं बोलणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ठाकरी शैलीत एकनाथ शिंदे व बंडखोरांचा समाचार घेतला.
Eknath Shinde - Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on Eknath Shinde: शिवसेनेतील बंडावर कालपर्यंत संयमानं बोलणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ठाकरी शैलीत एकनाथ शिंदे व बंडखोरांचा समाचार घेतला.

    • Uddhav Thackeray on Eknath Shinde: शिवसेनेतील बंडावर कालपर्यंत संयमानं बोलणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ठाकरी शैलीत एकनाथ शिंदे व बंडखोरांचा समाचार घेतला.

Uddhav Thackeray Slams Eknath Shinde: शिवसेनेतील बंडाळीचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांच्यावर मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट तोफ डागली. एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं?,' असा भावनिक सवाल उद्धव यांनी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसमोर केला. 'मातोश्रीवर घाणेरडे आरोप केल्यानंतर मी शांत बसणार नाही. आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा, असं आवाहनही उद्धव यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केलं.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

chicken shawarma news : धक्कादायक! मुंबईत रस्त्यावरील निकृष्ट चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू; दोघांना अटक

शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जिल्हाप्रमुखांचा मेळावा आज शिवसेना भवनात झाला. या जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व मंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला. ‘एकनाथ शिंदे यांना मी काय कमी केलं? नगरविकास मंत्री पद दिलं. माझ्याकडची दोन खाती त्यांना दिली. याच्या मुलाला खासदार केलं. मग माझ्या मुलानं काहीच करायचं नाही का?,' असा प्रश्न उद्धव यांनी केला. 'कालपर्यंत बाळासाहेब विठ्ठल आणि मी बडवा होता. आता मी विठ्ठल आणि इतर लोक बडवे झाले. आदित्यलाही बडवा बोललं जात आहे. पण हे बोलणाऱ्यांचा मुलगा खासदार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘आपण ज्यांना मोठं केलं, त्यांची स्वप्न मोठी झाली, ती मी पुरी करू शकत नाही. महत्त्वाकांक्षा असावी, पण ज्यानं दिलं त्यालाच खावं अशी महत्त्वाकांक्षा नसावी. माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. जे सोडून गेले, त्यांचं मला वाईट का वाटावं? बंड झाल्यानंतरही शिवसेना याआधी दोन वेळा सत्तेत आली आहे. कितीही आमदार घेऊन जा, शिवसेनेला काहीही होणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं. 

माजी मंत्री संजय राठोड यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. 'संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळून घेतलं होतं,’ याची आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा