मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेना सोडून गेलेल्यांची अवस्था बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट; राष्ट्रवादीतील नाट्याच्या निमित्तानं 'सामना'तून जहरी टीका

शिवसेना सोडून गेलेल्यांची अवस्था बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट; राष्ट्रवादीतील नाट्याच्या निमित्तानं 'सामना'तून जहरी टीका

May 08, 2023, 05:07 PM IST

  • Saamana Editorial on Sharad Pawar Resignation Drama : शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य करताना शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. 

Uddhav Thackeray

Saamana Editorial on Sharad Pawar Resignation Drama : शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य करताना शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे.

  • Saamana Editorial on Sharad Pawar Resignation Drama : शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य करताना शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. 

Saamana Editorial on Sharad Pawar Resignation Drama : 'शिवसेना सोडून जे गेले, त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे. त्यामुळं भाजपच्या खाणाखुणांना भुलून पक्ष सोडणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. जे जातील, त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील. मग तो कितीही मोठा सरदार असो, असा इशारा शिवसेनेनं (ठाकरे गट) दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

somaiya school: पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्टला Like करणे भोवले; मुख्याध्यापिकेला नोकरीवरून काढले

Pune warje firing : बारामतीमध्ये मतदान संपताच पुण्यातील वारजे माळवाडीत गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या तिघांनी केले फायरिंग

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान विभागाचा यलो अलर्ट, गारपीटीचीही शक्यता

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीत नुकत्याच झालेल्या राजीनामानाट्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'मध्ये ‘पवार पुन्हा आले! भाजपचे लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच’ अशा शीर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यातून ईडी, सीबीआयच्या भीतीनं पक्ष सोडून गेलेल्यांवर जळजळीत टीका करतानाच, कुंपणावर असलेल्यांना इशारा देण्यात आला आहे. अग्रलेखात भारतीय जनता पक्षावरही सडकून टीका करण्यात आली आहे.

‘भाजपच्या घरास दरवाजा काय, साधा पडदाही नाही. कोणीही आत घुसतो आहे. नैतिकता व नीतिमत्ता औषधालाही उरलेली नाही. आज सीबीआय, ईडीच्या भयानं भाजपमध्ये प्रवेश करून तात्पुरता दिलासा मिळेल. पण डोक्यावरची तलवार लटकती ठेवूनच पुढं जगावं लागेल. स्वतःस तालेवार-मातब्बर वगैरे समजणाऱ्यांना हे समजत नसेल तर आजपर्यंतचं त्यांचं वागणं, बोलणं, डोलणं फुसकंच होतं असंच मानायला हवं. भाजपला लोकशाही मार्गानं निवडणुका जिंकायच्या नाहीत. तेवढी त्यांची कुवत नाही. विरोधकांची बलस्थानं फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचं आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचं की एक दिवस वाघ बनून जगायचं, याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकानं करायला हवा, असा सूचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे. 'कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो, असा खोचक टोलाही भाजपच्या वाटेवर असलेल्यांना लगावण्यात आला आहे.

मोदी जगातील सर्वात मोठे नौटंकीबाज

शरद पवार यांच्या राजीनाम्याला ‘नौटंकी’ म्हणणाऱ्या भाजपवर अग्रलेखात निशाणा साधला आहे. भाजप हा एक पोटदुख्या पक्ष आहे. दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असं त्यांना कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे. इतरांवर ‘नौटंकी’ असा आरोप करण्यापूर्वी जगातील सगळ्यात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त पावलेल्या आपल्या पंतप्रधान मोदींकडे त्यांनी आधी पाहायला हवे, असा बोचरा टोला अग्रलेखातून हाणण्यात आला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा