मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेची मोठी खेळी.. एकनाथ शिंदेंसह १२ बंडखोरांची आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र

शिवसेनेची मोठी खेळी.. एकनाथ शिंदेंसह १२ बंडखोरांची आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र

Jun 23, 2022, 10:39 PM IST

    • बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंसह १२ बंडखोरांची आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र

बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

    • बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) जवळपास ३५ ते ४० शिवसेनाआमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारही (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

Salman Khan firing Case: सलमान खान गोळीबार केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीची आत्महत्या

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर! सीएसएमटी स्थानकाजवळ रेल्वेचा डबा घसरल्याने प्रवाशांचे झाले होते हाल!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

आता बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, बालाजी किनीकर, अनिल बाबर, भारत गोगावले,  प्रकाश सुर्वे, महेश शिंदे,अब्दुल सत्तार, यामिनी जाधव, भुमरे, संजय शिरसाट लता सोनावणे १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी या पत्रात केली आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहण्याचा व्हिप काढला होता. पण ते बैठकीला आले नाहीत त्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली. त्या नोटीसीला काही जणांनी उत्तरं दिली. पण ज्यांनी उत्तर दिली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिलं आहे.

जे आमदार उपस्थित राहिले नाहीत अशा १२ आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे, उर्वरित आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही अजय चौधरी यांनी केली आहे.

या आमदारांवर कारवाईची मागणी
१ एकनाथ शिंदे
२ तानाजी सावंत
३ प्रकाश सुर्वे
४ बालाजी किणीकर
५ अनिल बाबर
६ लता सोनावणे
७ यामिनी जाधव
८ संजय शिरसाट
९ भरत गोगावले
१० संदीपान भुमरे
११ अब्दुल सत्तार
१२ महेश शिंदे

या बारा आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली असल्याचे अजय चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!

घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 

एकूणच शिंदे आणि शिवसेनेमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.