मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sex Racket : पुण्यातील सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड; ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

Sex Racket : पुण्यातील सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड; ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

Jan 27, 2023, 03:17 PM IST

    • Pimpri Chinchwad Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत उच्चभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्याची घटना समोर आली आहे.
Sex Racket In Pimpri Chinchwad (HT)

Pimpri Chinchwad Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत उच्चभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्याची घटना समोर आली आहे.

    • Pimpri Chinchwad Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत उच्चभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्याची घटना समोर आली आहे.

Sex Racket In Pimpri Chinchwad : पुण्यातील पिंपळे सौदागरमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड परिसरातील आणखी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्याची घटना समोर आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली पिंपरी चिंचवडमधील उच्चभ्रू वस्तीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. याशिवाय त्याच्याकडून ३४ हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळं आता उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

chicken shawarma news : धक्कादायक! मुंबईत रस्त्यावरील निकृष्ट चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू; दोघांना अटक

Palghar Crime: आधी सोशल मीडियावरून केली मैत्री, नंतर भेटायला बोलावून केले कांड! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल २२ मुलींची फसवणूक तर ७ तरुणींना लग्न करून गंडवले, आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये प्रसिद्ध Neung Thai या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवला. त्यावेळी तिथं सेक्स रॅकेट सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी छापा मारला. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणलेल्या मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. याशिवाय घटनास्थळीच एका आरोपीला अटक करण्यात आली असून ओमकार विनायक जोशी आणि नंदराम वैभव गोविंद या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमधील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी करत सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. त्यानंतर आता पिंपरीत पुन्हा वेश्याव्यवसाय सुरू असल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलिसांकडून केला जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा