मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Honor Killing : ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरलं! वडील, मामा आणि भावांकडून डॉक्टर तरुणीची हत्या

Honor Killing : ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरलं! वडील, मामा आणि भावांकडून डॉक्टर तरुणीची हत्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 01:46 PM IST

nanded Honor Killing : ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरले आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या वडील व भावांनी डॉक्टर मुलीची हत्या करून मृतदेह शेतात जाळला व राख ओढ्यात टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

Nanded Honor Killing : ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. उच्च शिक्षित मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे वडील, भाऊ आणि तिच्या मामांनी मिळून तिची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला.  नात्याला काळिमा फासणारी ही घटना नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल गावात घडली आहे. शुभांगी जोगदंड (वय २३) असे मृत तरुणीचे नाव असून ती बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी ही वैद्यकीय शाखेच्या BHMS च्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती. शुभांगीचे गावातीलच एक तरुणावर प्रेम होते. मात्र त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध होता. कुटूंबाने तिचे दुसरीकडे लग्न जुळवले मात्र तिने ठरलेलं लग्न मोडलं होतं. लग्न मोडल्यामुळे गावात आपली बदनामी झाली, या रागातून आरोपी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भावांनी मुलीला ठार मारलं.


पाच जणांनी शुभांगीची हत्या केल्यानंतर खूनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेतात नेऊन जाळलं आणि तिची राख ओढ्यात फेकून दिली. तीन-चार दिवसांपासून गावातील मुलगी अचानक गायब झाल्यामुळे गावातील लोकांना संशय आला. यानंतर काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. त्यानंतर पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

IPL_Entry_Point

विभाग