मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना खासगी बसने उडविले

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना खासगी बसने उडविले

Jul 11, 2022, 10:15 PM IST

    • पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथील पुणा थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना भरधाव आलेल्या खासगी प्रवासी बसने उडविले.
अपघातग्रस्त वाहन

पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथील पुणा थांब्यावर वाहनांचीप्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना भरधाव आलेल्या खासगी प्रवासी बसने उडविले.

    • पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथील पुणा थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना भरधाव आलेल्या खासगी प्रवासी बसने उडविले.

सातारा : पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथील पुणा थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना भरधाव आलेल्या खासगी प्रवासी बसने उडविले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्रीच्या वेळी झाला. जखमींना शिरवळ तसेच पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. शिरवळ पोलिसांनी खासगी बसचालकाला ताब्यात घेतले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

घटनास्थळ व शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील कवठे येथील एका खासगी कंपनीमध्ये मुलाखतीसाठी आलेल्या मयूर रवींद्र रावे (वय २३, सध्या हिंजवडी, पुणे. मूळ रा. चिखली, जि. बुलडाणा) हा तरुण कंपनीमधील मुलाखत संपवून पुणे येथे जाण्याकरिता खासगी कंपनीमधील अधिकारी रणजित राजाराम कुंभार (३२, रा. सातारा) यांच्यासह शिरवळ हद्दीमधील महामार्गावर पुणा थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत होता. दरम्यान, कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या खासगी प्रवासी वाहनाने (एआर ०२ ए ९६९१) उडवले.  बसचा चालक गुरुराज तमन्ना कुलकर्णी (२६, रा. फत्तेपूर, तालीकोट, जि. विजयपूर, कर्नाटक) याने अचानकपणे महामार्गावर रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना गतिरोधक समजून अचानक ब्रेक मारले. त्यानंतर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर फिरत वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्यांवर गेले.

शिरवळ येथील पुणा थांब्यावर वारंवार अपघात घडत आहेत. वारकऱ्यांच्या वाहनांना अपघात होऊन वारकरी जखमी झाले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन दिवसापूर्वीत येथील थांबा बंद करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा